Mirchi Music Award 2020 : ‘कलंक’च्या गाण्यानं मारली ‘बाजी’, कोणाला कोणता अवॉर्ड जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – संगीत क्षेत्रातील प्रतिष्ठीत मिरची अवॉर्डची घोषणा करण्यात आली आहे. यशराज स्टुडिओत झालेल्या एका कार्यक्रमात अवॉर्ड्सची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी संगीत क्षेत्रातील आणि फिल्म इंडस्ट्रीतील अनेक कलाकार उपस्थित होते. यावेळी ए आर रहमान, नेहा कक्कर आणि विशाल शेखर असे अनेक सिंगर उपस्थित होते. त्यांनी सादरीकरणही केलं.

अवॉर्ड्सबद्दल बोलायचं झालं तर यावेळी कलंकच्या टायटल ट्रॅकनं बाजी मारली. कलंक सिनेमा हा मल्टीस्टारर सिनेमा असूनही बॉक्स ऑफिसवर जास्त काही चालला नाही. कलंकच्या टायटल ट्रॅकला साँग ऑफ द ईयर अवॉर्ड मिळाला आहे. तर केसरीला अल्बम ऑफ ईयर अवॉर्ड देण्यात आला आहे.

कोणाल कोणता अवॉर्ड मिळाला ?

साँग ऑफ द ईयर- कलंक (टायटल ट्रॅक)

अल्बम ऑफ द ईयर- केसरी

मेल वॉकलिस्ट ऑफ द ईयर- अरिजीत सिंग (कलंक)

फीमेल वॉकलिस्ट ऑफ द ईयर- श्रेया घोशाल (घर मोरे परदेशिया, कलंक)

म्युझिक कंपोजर ऑफ द ईयर- प्रीतम (कलंक टायटल ट्रॅक)

लिरिसिस्ट ऑफ द ईयर- अमिताभ भट्टचार्य (कलंक टायटल ट्रॅक)

लिसनर्स चॉईस साँग ऑफ द ईयर- बेखयाली (कबीर सिंग)

लिसनर्स चॉईस अल्बम ऑफ द ईयर- कबीर सिंग

लिसनर्स चॉईस इंडिपेंडेंट- वास्ते

बेस्ट साँग इंजिनियर (रेकॉर्ड अँड मिक्सिंग)- विजय दयाल

बेस्ट बॅकग्राऊंड स्कोर- मंगेश धाकडे (आर्टीकल 15)

लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड- उषा मंगेशकर