Mirzapur-2 मधील ‘रॉबिन’नं गर्लफ्रेंडसोबत अचानक केलं लग्न ! त्याचाच डायलॉग मारत चाहते म्हणाले – ‘ये भी ठिक है’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडिओ (Amazon Prime Video) वरील मिर्झापूर (Mirzapur) ही वेब सीरिज खूपच गाजली आहे. अलीकडेच या सीरिजचा दुसरा सीजनही (Mirzapur 2) रिलीज झाला आहे. ज्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. या सीजनमध्ये रॉबिन नावाचं एक कॅरेक्टर असं होतं ज्यानं खूप अटेंशन घेतलं. प्रियांशू पेनयुली (Priyanshu Painyuli) यानं हा रोल केला होता. प्रियांशुनं त्याची लाँग टाईम गर्लफ्रेंड वंदना जोशी (Vandana Joshi) सोबत लग्न केलं आहे. कोरोनाच्या गाईडलाईन्स फॉलो करत दोघं विवाहबद्ध झाले.

प्रियांशू पेनयुली आणि वंदना जोशी (Priyanshu Painyuli-Vandana Joshi) यांनी डेहरादूनमध्ये लग्न केलं. प्रियांशूनं त्याच्या लग्नाचा एक व्हिडिओ इंस्टा स्टोरीला शेअर केला आहे. यात त्यानं वधू वंदनाला स्पोर्टी माउंटेन बाईकवर बसवल्याचं दिसत आहे. स्टोरी शेअर करताना प्रियांशूनं लिहिलं की, माझ्या सुंदर पत्नीला घेऊन चाललो आहे. आम्ही सोबत जात आहोत, एक सुंदर सुरुवात करण्यासाठी.

व्हिडिओत दिसत आहे की, वंदना कॅमेऱ्यात पाहून प्लाईंग किस देत आहे. प्रियांशू आणि वंदना यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशलवर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहेत. दोघंही एकमेकांसोबत खूप आनंदी दिसत आहेत. अनेक चाहत्यांनी प्रियांशूला लग्नासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

काहींनी तर अचानक समोर आलेल्या लग्नाच्या या पोस्टवर कमेंट करताना मिर्झापूर 2 मधील प्रियांशूचाच डायलॉग वापरला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, ये भी ठिक है आणि चकित झाल्याचं सांगितलं आहे.

You might also like