Mirzapur : अली फजलला ‘गुड्डू भैया’ ऐवजी ऑफर झाला होता ‘हा’ रोल ! ‘हे’ कारण सांगत वेब सीरिजसाठी दिला होता नकार

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडिओ (Amazon Prime Video) वरील मिर्झापूर (Mirzapur) ही वेब सीरिज खूपच गाजली आहे. अलीकडेच या सीरिजचा दुसरा सीजनही (Mirzapur 2) रिलीज झाला आहे ज्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळताना दिसत आहे. याच्या दुसऱ्या सीजनचं यश पाहून आता अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडिओनं याच्या तिसऱ्या सीजनला ग्रीन सिग्नल दिला आहे. दुसऱ्या सीजननंतर आता गुड्डू भैया अर्थात अभिनेता अली फजल (Ali Fazal) याची लोकप्रियात गगनाला भिडली आहे. अनेकांना माहीत नसेल अलीला आधी गुड्डू भैया नाही तर वेगळाच रोल ऑफर झाला होता. त्याला तो रोल चांगला न वाटल्यानं त्यानं सीरिज करण्यास नकार दिला होता. एका मुलाखतीत यानं याबाबत खुलासा केला आहे.

अली म्हणाला, मला मिर्झापूर सीरिजमधील गुड्डू भैयाचीच भूमिका आवडली होती. परंतु आधी मला दुसरं कॅरेक्टर करण्यास सांगितलं गेलं होतं. मला वाटतं तो बहुतेक मुन्नाचा रोल असावा जो दिव्येंदु शर्मा (Divyendu Sharma) नं केला आहे. स्क्रीप्ट वाचल्यानंतर मला गुड्डूचं कॅरेक्टर आवडलं. कारण मला वाटलं की, मी यात खूप काही करू शकतो.

मिर्झापूर सीरिजसाठी दिला होता नकार

अली पुढं बोलताना म्हणाला, मला त्या भूमिका आवडतात ज्या माझ्या अप्रेडिक्टेबल असतील. सर्व स्टोरी आधीच कळाली तर सीरिजमध्ये काही रस राहात नाही. टीम वर्क करतानाही मजा येत नाही. मी एकटा नाहीये. म्हणून कारण पुढं करत सांगितलं की, माझ्याकडे डेट्स नाहीयेत. नंतर मी सीरिज सोडली होती. नंतर मला पुन्हा कॉल आला आणि सांगितलं गेलं की, तुम्ही पुन्हा एकदा प्रयत्न करून पाहा असंही अली म्हणाला.

अलीनं गुड्डू भैयाची भूमिका अशी काही साकारली की, लोकांनी त्याला डोक्यावर घेतलं. त्यानं या रोलमध्ये जीव ओतला.

अलीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर श्रिया सारन हिचा हिंदी आणि इंग्रजीत आलेल्या (The Other End of the Line) या सिनेमात पहिल्यांदा काम केलं होतं. 2008 साली हा सिनेमा रिलीज झाला होता. 2011 साली तो ऑलवेज कभी कभी सिनेमात लिड रोलमध्ये दिसला होता. 2013 मध्ये आलेल्या फुकरे सिनेमातून त्याला ओळख मिळाली. मिर्झापूर या वेब सीरिजच्या दोन्ही सीजनमध्ये काम केल्यानंतर आता त्याची लोकप्रियत गगनाला भिडली आहे. त्याची गुड्डू पंडित अर्थात गुड्डू भैया ही भूमिका खूप गाजली आहे.