‘मिशन मंगल’चे दिग्दर्शक जगन शक्तींची प्रकृती ‘चिंताजनक’, रूग्णालयात दाखल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार स्टारर फिल्म ‘मिशन मंगल’ चा दिग्दर्शक जगन शक्ती याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जगनची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते आहे. मिळालेल्या माहितीनुसार तो तब्बल 24 तासांपेक्षा जास्त काळ रुग्णालयात दाखल असून बर्‍याच दिवसांपासून तो आजारी होता. त्याच्या मेंदूत ब्लड क्लॉट झाल्याने त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. जगनने ‘मिशन मंगल’ या चित्रपटातून दिग्दर्शक म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

डोक्यात ब्लड क्लॉटिंग झाल्याने त्याच्यावर उपचार सुरू असून तो अद्याप सबअर्बन रुग्णालयाच्या देखरेखीखाली आहे. जगनचे कुटुंबीय त्याच्यासोबत रूग्णालयात आहेत. जगन आपल्या मित्रांसह मुंबईत होता आणि तो अचानक खाली पडला. यानंतर त्याला रुग्णालयात आणले गेले, जिथे त्याच्या मेंदूत ब्लड क्लॉटिंगची समस्या असल्याचे समजले, जगन सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे.

‘मिशन मंगल’ चित्रपटाआधी जगन शक्तीने प्रसिद्ध दिग्दर्शक आर. बाल्की यांच्याबरोबर ‘चिनी कम’ यासह अनेक चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. ‘मिशन मंगल’ नंतर जगन सध्या अक्षयसोबत आणखी एका चित्रपटावर चर्चेत आला होता, जो 2014 मधील सुपरहिट तमिळ चित्रपट ‘कट्टी’ चा रीमेक असेल. हिंदीमधील हा चित्रपट ‘इक्का’ या नावाने तयार केला जाईल.

फेसबुक पेज लाईक करा –