Akshay Kumar च्या ’बच्चन पांडेय’सह अर्धा डझनपेक्षा जास्त चित्रपटांचे शूटिंग सुरू, 3 मोठ्या चित्रपटांची घोषणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – 2020 मध्ये कोरोना व्हायरसच्या प्रकोपानंतर 2021 सुरू होताच फिल्म इंडस्ट्री पुन्हा एकदा सावरताना दिसत आहे. नव्या वर्षाचे अजून पंधरा दिवस सुद्धा सरलेले नसताना 3 नव्या मोठ्या चित्रपाटांची घोषणा झाली आहे आणि अर्धा डझनपेक्षा जास्त चित्रपटांचे शूटिंग सुरू झाले आहे. यामध्ये काही चित्रपटांच्या दुसर्‍या शेड्यूलची शुटिंग देशाच्या विविध भागात सुरू आहे, ज्यामध्ये अक्षय कुमार, सैफ अली खान आणि शाहरुख ख़ानसह अनेक स्टार सहभागी आहेत. मात्र, अजूनपर्यंत मोठ्या चित्रपटांच्या रिलिजवर संशय कायम आहे.

डेहरादून, दिल्ली, भोपाळ आणि जैसलमेरमध्ये शूटिंग
अक्षय कुमारने बच्चन पांडेय चित्रपटाचे शुटिंग 7 जानेवारीपासून सुरू केले आहे. सध्या याचे शुटिंग राजस्थानच्या जैसलमेरमध्ये सुरू आहे. साजिद आणि अक्षयचा हा दहावा चित्रपट आहे.

सैफ अली खान आणि अर्जुन कपूर सध्या जैसलमेरमध्ये भूत पुलिस च्या दुसर्‍या शेड्यूलचे शूटिंग करत आहेत. यामी गौतम यामध्ये फिमेल लीड मध्ये आहे. पवन कृपलानी दिग्दर्शित हा हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. ही टीम 8 जानेवारीला राजस्थानमध्ये पोहचली होती.

राजकुमार राव आणि भूमी पेडणेकर सध्या उत्तराखंडमध्ये आहेत, डेहरादूनमध्ये ते आपला आगामी चित्रपट बधाईची शूटिंग करत आहेत. या चित्रपटाचे शूटिंग 5 जानेवारीला सुरू झाले होते.

थलाइवी पूर्ण केल्यानंतर कंगना राणावत आपला आगामी चित्रपट धाकड च्या शूटिंगसाठी 8 जानेवारीला मध्य प्रदेशच्या भोपाळ शहरात पोहचली होती. या चित्रपटाची शूटिंग भोपाळ, पचमढी आणि सारणीमध्ये दोन महिन्यापर्यंत होईल.

रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर हे लव रंजन दिग्दर्शित चित्रपटासाठी दिल्लीत आहेत.
तसेच शाहरुख ख़ान मुंबईमध्ये पठान चे शूटिंग करत आहे. तर, रणवीर सिंह, रोहित शेट्टी दिग्दर्शित सर्कस ची शुटिंग मुंबईत करत आहे. सलमान खान राधे- युअर मोस्ट वॉन्टेड भाई आणि अंतिम- द फाइनल ट्रुथ मध्ये बिझी आहे. नुकतीच जान्हवी कपूरने आगामी चित्रपट गुड लक जेरी ची शुटिंग मुंबईत सुरू केली आहे.

अजय देवगण आपला आगामी चित्रपट May Day च्या शुटिंगमध्ये बिझी आहे. याचे पहिले शेड्यूल जवळपास पूर्ण झाले आहे आणि पुढील शेड्यूलची तयारी सुरू आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अजय करत आहे.

या चित्रपटांची झाली घोषणा
नव्या वर्षात आतापर्यंत 3 मोठ्या चित्रपटांची घोषणा झाली आहे. यामध्ये अजय देवगणचा थँक गॉड आहे. अजयने 7 जानेवारीला या चित्रपटाची घोषणा केली होती. अजय सोबत सिद्धार्थ मल्होत्रा आणि रकुल प्रीत मुख्य भूमिका पार पाडताना दिसतील. अजय 21 जानेवारीपासून चित्रपटाचे शुटिंग सुरू करणार आहे. दिग्दर्शक इंद्र कुमार आहेत.

10 जानेवारीला ऋतिक रोशनने आपल्या फॅन्ससाठी फायटर ची घोषणा करत वाढदिवसाचे रिटर्न गिफ्ट दिले. या चित्रपटात दीपिका पदुकोण प्रथमच त्याच्यासोबत स्क्रीन शेयर करत आहे. चित्रपट पुढील वर्षी 30 सप्टेंबरला रिलिज होईल.

11 जानेवारीला विक्की कौशलने आपाला आगामी चित्रपट अश्वत्थामाची घोषणा केली आहे. हा सायन्स फिक्शन चित्रपट आहे आणि विक्की महाभारतातील चर्चित पात्र अश्वथामाची भूमिका करत आहे. दिग्दर्शक आदित्य धर तर निर्मिता रॉनी स्क्रूवाला आहे.