विंग कमांडर अभिनंदन यांच्यावर चित्रपट, ‘या’ अभिनेत्याला परवानगी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीरमधील पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने केलेल्या बालाकोट हवाई हल्ल्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या जीवनावर चित्रपट बनवण्याची परवानगी देण्यात आली आहे. अभिनेता विवेक ओबेरॉय याला याचे अधिकार मिळाले असून लवकरच तो अभिनंदन यांच्या जीवनावर चित्रपट बनवणार आहे.

अभिनंदन वर्धमान यांच्या या हवाई हल्ल्यातील भूमिकेमुळे संपूर्ण देशासाठी होरी झाले होते. या बहादूरीबद्दल त्यांना वीर चक्र देऊन गौरवण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना आदरांजली म्हणून चित्रपट बनवला जाणार आहे. बालाकोट हवाई हल्ल्यावर सिनेमा तयार करण्याची परवानगी त्याला देण्यात आली आहे. या सिनेमाचे चित्रीकरण जम्मू-कश्मीर, दिल्ली आणि आग्रामध्ये होणार असून याचे चित्रीकरणाची सुरुवात पुढील वर्षी सुरुवातीला केली जाणार आहे. तीन भाषांमध्ये हा सिनेमा बनवला जाणार असून हिंदी, तामिळ आणि तेलगू भाषेत हा सिनेमा बनवला जाणार आहे.

या सिनेमाविषयी बोलताना विवेक ओबेरॉय म्हणाला कि, एक सच्चा देशभक्त या नात्याने हा सिनेमा बनवणे माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट असून आपले लष्कर किती शक्तिशाली आहे हे जगाला सांगणे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्याचबरोबर या सिनेमाच्या माध्यमातून भारतीय लष्कराला आणि विंग कमांडर अभिनंदन यांना आदरांजली देखील ठरेल. त्यांनी या हल्ल्याचे कशाप्रकारे नियोजन केले, कशाप्रकारे विमान कोसळल्यानंतर पाकिस्तानमधील तुरुंगात दिवस काढले हे नागरिकांना सांगण्यासारखे आहे. मी भारतीय वायुसेनेच्या आभारी आहे कि, त्यांनी हा सिनेमा बनवण्याची मला परवानगी दिली.

दरम्यान, या वर्षी सुरुवातीला देखील विवेक ओबेरॉय याने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर चित्रपट बनवला होता. मात्र बॉक्स ऑफिसवर फार काही कमाल दाखवू शकला नव्हता.

आरोग्यविषयक वृत्त –