‘तान्हाजी’ सिनेमात ‘हा’ मराठमोळा अभिनेता शिवाजी महाराजांच्या भूमिकेत ! ‘बाहुबली’ सोबत खास ‘कनेक्शन’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांपैकी असणाऱ्या वीर तान्हाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची गाथा सांगणारा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तान्हाजी द अनसंग वॉरियर असं या सिनेमाचं नाव आहे. बॉलिवूड स्टार अजय देवगन या सिनेमात तान्हाजींच्या भूमिकेत दिसणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षकांना प्रश्न पडला होता की, शिवाजी महाराजांची भूमिका नेमकं कोण साकारणार ?

अखेर या प्रश्नाचं उत्तर आता मिळालं आहे. अभिनेता शरद केळकर या सिनेमात शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. त्याने सोशल मीडियावरून आपला लुक शेअर केला आहे. शरदनं बाहुबली सिनेमाच्या हिंदी व्हर्जनला आपला आवाज दिला होता.

ही भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याचा आनंद व्यक्त करत शरद आपल्या पोस्टमध्ये म्हणतो, “एखाद्या कलाकरासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पेहरावात त्यांची देहबोली साकारण्याऐवढी भाग्याची आणि पवित्र गोष्ट कुठलीच नाही….हर हर महादेव… छत्रपती शिवाजी महाराज – पत्थर सें ठोकर तो सब खाते हैं, पत्थर को ठोकर मारे वह मराठा.”

https://www.instagram.com/p/B41t7WUp4M3/?utm_source=ig_embed

या सिनेमात स्वराज्यजननी जिजामाता आणि मुघल शासक औरंगजेबाच्या भूमिका कोण साकारणार आहे हेही समोर आलं आहे. जिजाऊंची भूमिका अभिनेत्री पद्मावती राव साकारणार आहे तर अभिनेता ल्युक केनी हा औरंगजेबाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यांचाही लुक समोर आला आहे.

https://www.instagram.com/p/B41uv4NJQdA/?utm_source=ig_embed

तान्हाजी द अनसंग वॉरियर हा सिनेमा 10 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.

Visit : Policenama.com

‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !