‘नच बलिए सीजन ९’ मध्ये सलमान खानची धमाकेदार एन्ट्री, ओपनिंगला येणार ही ‘प्रसिद्ध’ जोडी

मुंबई : वृत्तसंस्था – या वर्षीचा मोस्ट अवेटेड डान्स रियलिटी शो म्हणजेच ‘नच बलिए सीजन ९’ हा शो सुपरस्टार सलमान खान प्रोड्यूस करत आहे. हा शो पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता वाढत चालली आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीमुळे हे पक्के झाले आहे की, सध्याची मोस्ट फेवरेट असलेली जोडी रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण या शो मध्ये धमाकेदार एन्ट्री करणार आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, शो च्या पहिल्या एपिसोडसाठी अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पादुकोणला अप्रोच केले आहे. या शो चे निर्माते आणि अन्य लोकांनी या जोडीशी चर्चा देखील केली आहे. सध्या ‘८३’ चित्रपटामध्ये दोघे ही व्यस्त असल्यामुळे दोघांनीही वेळ काढणे शक्य होईल की नाही ? हे सांगता येत नाही तरी देखील या शोसाठी दोघे विचार करत आहे.

जर या दोघांना चित्रपटाच्या शूटिंगमधून या शोसाठी वेळ काढणे शक्य झाले तर कदाचित ते या शोमध्ये एन्ट्री करतील. ‘नच बलिए’ हा पहिला शो अभिनेता सलमान खान होस्ट करणार आहे आणि रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोणसोबत सलमान शो जज पण करेल.

या व्यतिरिक्त आत्तापर्यंत शोमध्ये जज म्हणून फक्त अभिनेत्री रवीना टंडनचे नाव फायनल झाले आहे. शोमध्ये स्पर्धकाच्या नावामध्ये उर्वशी ढोलकिया आणि तिचा एक्स बॉयफ्रेंड विशाल आदित्य यांचे नाव फायनल केले गेले आहे.

आरोग्यविषयक वृत्त – 

पश्चिम उपनगरातील रेल्वे प्रवाशांसाठी आता ‘रेल्वे आरोग्य कार्ड’ 

नियमित तोंडाची स्वच्छता ठेवल्यास अनेक आजार राहतील दूर

तंदुरुस्त राहण्यासाठी वेळापत्रकात करा थोडासा बदल

‘फिट अँड फाइन’ राहण्यासाठी नियमित करा हे उपाय