अनुष्का शर्मानं शेअर केलेल्या पती विराटच्या ‘त्या’ व्हिडीओवर नागपूर पोलिसांनी केली ‘अशी’ कमेंट ! (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   लॉकडाऊनच्या काळात टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आणि त्याची पत्नी बॉलिवूड स्टार अनुष्का शर्मा एकत्र टाईम स्पेंड करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून आपल्या फोटो आणि व्हिडीओमुळं विराट आणि अनुष्का चर्चेत येताना दिसत आहेत. विराटचा आणखी एक व्हिडीओ समोर आला होता ज्यात तो अनुष्कासाठी डायनासोर बनला होता आणि तशी अॅक्टींग करताना दिसला होता. सध्या हा व्हिडीओ खूप चर्चेत आहे. खास बात अशी की, या व्हिडीओवर आता नागपूर पोलिसांनी कमेंट केली आहे.

अनुष्कानं तिच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला होता. काही सेंकदाच्याच या व्हिडीओत विराट डायनासोरची अॅक्टींग करताना दिसत आहे. विराटची खास अॅक्टींग अनुष्कासोबतच चाहत्यांनाही खूप आवडली होता. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मजेदार व्हिडीओनं साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

नागपूर पोलिसांनी या व्हिडीओवर कमेंट करत लिहिलं की, “रेस्क्युसाठी आम्ही महाराष्ट्र वन विभागाला पाठवू का ?” नागपूर पोलिसांनी फनी अंदाजात केलेली ही कमेंट साऱ्यांनाच आवडली आहे. सध्या या कमेंटनं साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

अनुष्काच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिनं प्रोड्युस केलेली पाताल लोक ही वेब सीरिज नुकतीच अॅमेझॉन प्राईमवर रिलीज झाली आहे. या सीरिजचं खूप कौतुक झालं आहे. अनुष्का दीर्घकाळापासून सिनेमांपासून दूर आहे. तिचा परी हा सिनेमा रिलीज होऊन 2 वर्षे झाली आहे. ती सुई धागा या सिनेमात वरुण धवनसोबत दिसली होती. या सिनेमातील तिच्या अभिनयाचंही खूप कौतुक झालं होतं.

You might also like