Birth Anniversary : आई नरगिस दत्तच्या वाढदिवशी भावूक झाला संजय ! शेअर केले ‘अनसीन’ फोटो (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड स्टार संजय दत्तची आई आणि बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री नरगिस दत्त यांचा आज (दि 1 जून) वाढदिवस आहे. नरगिस त्या अभिनेत्रींपैकी एक होत्या ज्यांनी आपल्या कलेला सिनेमातून वेगळ्याच उंचीवर नेलं. संजय दतनं आता काही असनीन फोटो शेअर त्यांची आठवण काढली आहे.

संजय दत्त आई नरगिससोबतचे काही जुने फोटो असलेला एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना संजयनं लिहिलं की, “वाढदिवसाच्या शुभेच्छा आई. तुझी खूप आठवण येते.” संजय नरगिस यांच्या खूप क्लोज होता.

नरगिस यांच्याबद्दल थोडक्यात…

राज्यसभेसाठी नॉमिनेट होणाऱ्या आणि पद्मश्री पुरस्कार मिळवणाऱ्या नरगिस पहिली अभिनेत्री होती. त्यांच्या अभिनयाची जादू अशी काही पसरली होती की, 1968 मध्ये जेव्हा बेस्ट अॅक्ट्रेससाठी जेव्हा पहिला फिल्मफेअर अवॉर्ड देण्याची वेळ आली तेव्हा सर्वात आधी त्यांनाच निवडण्यात आलं.

नरगिस यांचं लहानपणीचं नाव फामिता रशीद होतं. त्यांचा जन्म 1 जून 1929 रोजी पश्चमि बंगालच्या कोलकाता या शहरात झाला होता. त्यांचे वडिल उत्तमचंद मोहनदास एक प्रसिद्ध डायरेक्टर होते. त्यांची आई जद्दनबाई प्रसिद्ध नर्तक आणि गायिका होत्या. आईच्या सहकार्यानंच त्या सिनेमाशी जोडल्या गेल्या. तलाश-ए-हाक या सिनेमातून त्यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली. यात त्यांनी चाईल्ड आर्टीस्ट म्हणून काम केलं होतं. त्या वेळी त्या 6 वर्षांच्या होत्या. या सिनेमानंतर त्या बेबी नरगिस म्हणून फेमस झाल्या.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like