‘नताशा’नं हार्दिक पंड्यासोबत साजरी केली ‘होळी’, चाहते म्हणाले- ‘Happy Holi वहिणी’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बिग बॉस 8 फेम मॉडेल आणि अ‍ॅक्ट्रेस नताशा स्टानकोविक हिनं आपला होणारा नवरा टीम इ़ंडियाचा ऑलराऊंडर क्रिकेटर हार्दिक पंड्यासोबत आणि त्याच्या कुटुंबासोबत होळी साजरी केली आहे. नताशाचे होळी एन्जॉय करतानाचे काही फोटो समोर आले आहेत जे सध्या व्हायरल होताना दिसत आहेत.

नताशानं हार्दिक पंड्या आणि त्याच्या कुटुंबियांसोबत रंग खेळत होळी साजरी केली. नताशानं तिचे एन्जॉय करतानाचे काही फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केले आहे. नताशाच्या या फोटोंना चहात्यांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. नताशानं सर्वांना होळीच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. चाहत्यांनी नताशाचे फोटो लाईक केले आहेत. तिच्या फोटोवर कमेंट करत तिलाही त्यांनी होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. काहींनी तिला शुभेच्छा देताना वहिणी म्हणून हाक मारली आहे.

नताशाच्या लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं पांढऱ्या रंगाचा सूट घातला आहे. सोबतच तिनं पिंक कलरचा दुपट्टा कॅरी केला आहे. हार्दिकच्या लुकबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी पांढऱ्या रंगाचा कुर्ता घातला आहे. हार्दिक आणि नताशासोबच फोटोत त्याच भाऊ क्रुणाल पंड्या आणि त्याची पत्नी पंखुडी शर्मा हीदेखील दिसत आहे.

हार्दिक आणि नताशाचे हे होळी सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. चाहत्यांचा या फोटोला मोठा प्रतिसाद मिळत आहे. अनेकांनी फोटोवर कमेंट करत या जोडीचं कौतुक केलं आहे.