जेव्हा मीजान जाफरीनं गायलं ‘भीगी भीगी रातों में’, ‘बिग बीं’ची नात नव्या नवेलीचा सुटला कंट्रोल ! (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाईन टीम : बॉलिवूड स्टार जावेद जाफरीचा मुलगा अ‍ॅक्टर मीजान जाफरी आणि बिग अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेदी नंदा पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मीजाननं त्याचा एक गाणं गातानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यानंतर नव्या स्वत:ला कमेंट करण्यापासून रोखू शकलेली नाही. मीजाननं त्याच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात तो सिंगर अदनान सामीचं भीगी भीगी रातों में हे गाणं गात आहे. त्यानं गिटारही वाजवलं आहे.

व्हिडीओ शेअर करताना मीजान म्हणतो, “हे माझं लेट नाईट क्वरांटाईन रूटीन आहे. प्रत्येक शुक्रवारी मी असाच एख व्हिडीओ शेअर करणार आहे. जर तुम्हाला तुमच्या आवडीचं गाणं ऐकायचं असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. हे माझं फेवरेट गाणं आहे जे अदनान सामी यांनी गायलं आहे.”

मीजानचा आवाज ऐकल्यानंतर नव्या स्वत:ला आवरू शकली नाही. तिला हे गाणं एवढं आवडलं की, तिनं हार्ट इमोजी पोस्ट करत कमेंट केली आहे.

अनेक दिवसांपासून दोघांच्या रिलेशनशिपच्या बातम्या समोर येत आहेत. परंतु मीजाननं या साऱ्यांचं खंडन केलं आहे. ते फक्त मित्र आहेत असं त्यानं प्रत्येक वेळी सांगितलं आहे.

You might also like