अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीनं पत्नीच्या आरोपांवरील मौन सोडलं, आलियाविरोधात घेतली मोठी अ‍ॅक्शन !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी आलिया सिद्दीकी हिनं त्याला तलाकची नोटीस पाठवली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आलियानं सोशल मीडियावर अनेक खुलासे केले होते. आतापर्यंत नवाजुद्दीनची यावर काही प्रतिक्रिया आली नव्हती. परंतु तब्बल एक ते दीड महिन्यानंतर नवाजनं या प्रकरणी मौन सोडलं आहे. नवाजुद्दीनं आलियावर मोठे आरोप केले आहेत.

नवाजुद्दीन सिद्दीकीसोबतच्या आपल्या नात्यावर आलिया सिद्दीकीनं अनेकदा भाष्य केलं आहे. परंतु आता अशी माहिती आहे की, नवाजुद्दीननं पत्नीला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. एका इंग्रजी वृत्तानुसार, नवाजनं पत्नीला जी नोटीस पाठवली आहे त्यात तिच्यावर फसवणुकीत सहभागी होणं, जाणून बुजून सुनियोजित पद्धतीनं मानहानी करणं आणि चारित्र्याची बदनामी करणं असे आरोप लावण्यात आले आहेत. या नोटीशीत असंही म्हटलंय की, अभिनेत्यानं 19 मे रोजीच 15 दिवसांच्या आतच आलियाच्या नोटीशीला उत्तर दिलं होतं.

नवाजनं नोटीशीतून पत्नी आलियाला त्याच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणं आणि अलीकडेच ती जे काही बोलली आहे त्याबद्दल लिखित स्वरूपात स्पष्टीकरण मागितलं आहे.

अलीकडेच झालेल्या एका मुलाखतीत आलिया म्हणाली होती की, ती तिच्या मुलांची शाळेची फी देण्यासाठी सक्षम नाही. कारण नवाजनं तिला कथित मासिक भत्ता देणं बंद केलं आहे. अभिनेत्याच्या वकिलानं आलियाच्या दाव्यांचं खंडन केलं आहे.

नवाजचे वकिल अदनान शेख यांनी एका वेबासाईटला दिलेल्या मुलाखतीत सांगतिलं की, माझ्या क्लायंटकडून अजूनही ईएमआय दिला जात आहे. मुलांशी संबंधित इतर खर्चही दिले जात आहेत. तलाकच्या नोटीशीलादेखील उत्तर दिलं आहे. या आरोपांच्या मदतीनं नवाजला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे.