अनेक मीडिया रिपोर्ट्स समोर आल्यानंतर आता नवाजुद्दीनची पत्नी आलियानं ट्विटरवरून दिलं ‘हे’ स्पष्टीकरण !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवू़ड स्टार नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याची पत्नी आलिया आता तलाकसाठी कायदेशीर लढाई लढत आहेत. गेल्या काही दिवसांपासून आलियाच्या हवाल्यानं अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये खूप काही सांगितलं आणि लिहिलं गेलं. या रिपोर्ट्सनंतर आता आलिया ट्विटरवरून स्पष्टीकरण दिलं आहे.

28 मे 2020 रोजी आलियाच्या अकाऊंटवरून दोन ट्विट करण्यात आले आहेत. पहिल्या ट्विटमध्ये तिनं म्हटलं की, “मला मीडियातून कॉल येत आहे. माहिती घेण्यासाठी अनेक काल्पनिक प्रश्न केले जात आहेत. पत्रकारांनो कृपया हे समजून घ्या की, नवाजची सार्वजनिक इमेज आणि त्याच्या नावाचं रक्षण करण्यासाठी मी गेल्या 10 वर्षांपासून मौन बाळगलं आहे. जोपर्यंत खुद्द नवाज मला मौन तोडायला मजबूर नाही करत हे मौन असंच कायम राहणार आहे.”

https://twitter.com/ASiddiqui2020/status/1265926557182259200?s=20

दुसऱ्या ट्विटमध्ये आलिया म्हणते, “जोपर्यंत मी माझ्या ट्विटर हँडलवरून एखादा दावा स्विकार किंवा अस्विकार करत नाही. तोवर कोणत्याही वर्गाकडून केलेला कथित आरोप मानण्याच्या लायक नाही.”

https://twitter.com/ASiddiqui2020/status/1265927077749878784?s=20

2009 मध्ये झालं होतं लग्न
नवाज आणि आलिया 2009 मध्ये विवाहबद्ध झाले होते. त्यांना दोन मुलं आहे. याआधी नवाजनं शीबासोबत लग्न केलं होतं जे जास्त दिवस टिकलं नाही. सध्या नवाज उत्तर प्रदेशात आहे. 12 मे रोजीच तो कुटुंबसोबत तिथं आला आहे. सध्या तो त्याचं मूळ गाव बढान्यात आहे.

7 मे रोजी पाठवली होती नोटीस
आलिया सिद्दीकी हिनं नवाजला तलाक आणि मेंटेनंस भत्त्याची नोटीस 7 मे 2020 रोजी पाठवली आहे. आलियाचे वकिल अभय सहाय यांच्यानुसार, कोरोना व्हायरस पॅनडेमिकमध्ये स्पीड पोस्ट नसल्यानं व्हॉट्स अ‍ॅप आणि ईमेलच्या माध्यमातून नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यांनी असंही सांगितल आहे की यावर अद्याप नवाजकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.