नवाजुद्दीन सिद्दीकीला पत्नी आलियानं WhatsApp वर पाठवली ‘तलाक’ची नोटीस ! केले अनेक ‘गंभीर’ आरोप

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड स्टार नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी आलिया सिद्दीकी हिनं त्याला तलाक आणि मेंटेनंस भत्त्याची नोटीस पाठवली आहे. आलियाचे वकिल अभय सहाय यांच्यानुसार, कोरोना व्हायरस पॅनडेमिकमध्ये स्पीड पोस्ट नसल्यानं व्हॉट्स अॅप आणि ईमेलच्या माध्यमातून नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यांनी असंही सांगितल आहे की यावर अद्याप नवाजकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

सोमवारी (दि 18 मे) पीटीआयसोबत बोलताना सहाय म्हणाले, “माझी क्लायंट मिसेज सिद्दीकी हिनं व्हॉट्स अॅपद्वारे नोटीस पाठवली होती. ज्यात मेंटेनंस भत्ता आणि तलाकचा उल्लेख होता.” सहाय इतर कोणतीही माहिती देण्यास नकार दिला कारण ती नोटीस गोपनीय आहे. परंतु त्यांनी एवढंच सांगितलं की, नवाज आणि त्याच्या कुटुंबावर लावलेले आरोप खूपच गंभीर आहेत.

नवाज आणि आलिया 2009 मध्ये विवाहबद्ध झाले होते. त्यांना दोन मुलं आहे. याआधी नवाजनं शीबासोबत लग्न केलं होतं जे जास्त दिवस टिकलं नाही. सध्या नवाज उत्तर प्रदेशात आहे. 12 मे रोजीच तो कुटुंबसोबत तिथं आला आहे. सध्या तो त्याचं मूळ गाव बढान्यात आहे.