अभिनेता नवाजुद्दीनला तलाक देताना पत्नी आलियानं मागितली मुलांची कस्टडी, केले अनेक मोठे ‘खुलासे’

पोलीसनामा ऑनलाईन टीम :  बॉलिवूड स्टार नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी आलिया हिनं आता तलाक घेण्याचा निर्णय घेतला आहे. तिनं नवाजला व्हॉट्स अ‍ॅप आणि ईमेलच्या माध्यमातून नोटीस पाठवली आहे. अद्याप नवाजकडून कोणतंही उत्तर आलेलं नाही. आलिया तलाकसोबतच मुलांची कस्टडीदेखील मागितली आहे. अलीकडेच दिलेल्या मुलाखीत आलियानं तलाक घेण्याच्या कारणाबद्दल सांगितलं आहे.

नातं संपवण्याचं प्रमुख कारण नवाजचा भाऊ
नवाज आणि आलियाच्या लग्नाला 10 वर्षांहून अधिक काळ झाला आहे. एका मुलाखतीत बोलताना आलिया म्हणाली, “मी माझं मूळ नाव अंजलीसोबत परत येत आहे. हे नातं संपल्यांनंतर मला नाही वाटत की, मी नवाजच्या नावाचा वापर करावा. नवाजचा भाऊ शमास नवाब सिद्दीकी हे नातं संपवण्याचं प्रमुख कारण आहे.”

10 वर्षात खूप काही सहन केलं
आलिया म्हणाली, “खूप गोष्टी आहेत ज्या मला सार्वजनिक करायच्या नाहीत. लग्न झाल्यानंतर लगेचच समस्या यायला सुरुवात झाली. लॉकडाऊनमध्ये मी खूप विचार केला. माझ्या लक्षात आलं की, स्वाभिमान खूप महत्त्वाचा आहे जो माझ्या साठी तर संपलाच होता. मला तर असं वाटायचं की, माझं काहीच नाहीये. मला कायमच एकट वाटायचं.”

तडजोडीची काही शक्यता नाही
आलिया असंही म्हणाली की, “मी भविष्याचा काही विचार नाही केला परंतु आता हे लग्नाचं बंधन मला नको आहे. तडजोड करण्याची कोणतीही शक्यता नाही. मी मुलांना सांभाळलं आहे तर मी त्यांना सांगितलं आहे की, मुलांची कस्टडी माझ्याकडे असेल.

2009 मध्ये झालं होतं लग्न
नवाज आणि आलिया 2009 मध्ये विवाहबद्ध झाले होते. त्यांना दोन मुलं आहे. याआधी नवाजनं शीबासोबत लग्न केलं होतं जे जास्त दिवस टिकलं नाही. सध्या नवाज उत्तर प्रदेशात आहे. 12 मे रोजीच तो कुटुंबसोबत तिथं आला आहे. सध्या तो त्याचं मूळ गाव बढान्यात आहे.

7 मे रोजी पाठवली होती नोटीस
आलिया सिद्दीकी हिनं नवाजला तलाक आणि मेंटेनंस भत्त्याची नोटीस 7 मे 2020 रोजी पाठवली आहे. आलियाचे वकिल अभय सहाय यांच्यानुसार, कोरोना व्हायरस पॅनडेमिकमध्ये स्पीड पोस्ट नसल्यानं व्हॉट्स अ‍ॅप आणि ईमेलच्या माध्यमातून नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यांनी असंही सांगितल आहे की यावर अद्याप नवाजकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.