NCB नं करण जोहरला बजावले समन्स, ड्रग्स प्रकरणात होणार चौकशी, संपूर्ण बॉलिवूडमध्ये खळबळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – करण जोहर यांनी २८ जुलै २०१९ रोजी पार्टी दिली होती. यात दीपिका पादुकोण, मलायका अरोरा, अर्जुन कपूर, शाहिद कपूर, वरुण धवन, जोया अख्तर, विक्की कौशल, अयान मुखर्जी आणि रणबीर कपूर आदी उपस्थित होते. या पार्टीचा व्हिडिओ करण जोहरने स्वत: शूट करून सोशल मीडियावर टाकला होता. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या पार्टीमध्ये ड्रग्स वापरल्याचा आरोप करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, एनसीबी करण जोहरची बॉलीवूडमध्ये पसरलेल्या ड्रग्सच्या जाळ्याबद्दल चौकशी करणार आहे. दरम्यान, नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (NCB) चित्रपट निर्माता करण जोहर यांना समन्स बजावलं आहे. परंतु, एनसीबी कार्यालयात करण यांना कधी चौकशीसाठी हजर राहायचं हे अद्याप समजू शकलेलं नाही.

व्हिडिओमध्ये कोणतीही सामग्री नाही…
व्हिडिओचा पहिला फॉरेन्सिक अहवाल एनसीबीला सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात प्राप्त झाला. या अहवालात, व्हिडिओ पूर्णपणे वास्तविक म्हणून वर्णन केलं गेलं होतं . तसंच यात कोणतं ही एडिटिंग नाकारलं गेलं. काही दिवसांपूर्वी करण जोहरच्या घरी झालेल्या पार्टीच्या व्हायरल व्हिडिओचा दुसरा फॉरेन्सिक अहवालही नकारात्मक आला. या व्हिडिओबद्दल असं सांगितले जात होते की त्याच्या घरात ड्रग्ज पार्टी होती. गुजरातमधील गांधी नगरच्या एफएसएलने व्हिडिओमध्ये पाहिलेली पांढऱ्या रंगाची प्रतिमा प्रकाशाचे प्रतिबिंब होती, असं सांगितलं आहे. व्हिडिओमध्ये कोणत्याही प्रकारच्या सामग्रीची उपस्थिती नाकारली गेली आहे. अहवालात असं स्पष्ट केलं आहे की व्हिडिओमध्ये कोणतीही सामग्री किंवा ड्रग्ज सारखी इतर सामग्री दिसत नाही.