… म्हणून नवख्या अभिनेत्रींना पाहून होतो नीना गुप्ता यांना जळफळाट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री नीना गुप्ता आपल्या दमदार अभिनयाबरोबरच बोल्ड स्टाईल स्टेटमेंटसाठी देखील ओळखल्या जातात. सध्या अभिनेत्री नीना गुप्ता या नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमुळे चर्चेत आहे. मुलाखतीमध्ये नीना यांनी बॉलिवूडमधील नव्या अभिनेत्रीबद्दल असे काही म्हटले त्यामुळे त्या चर्चेत आल्या. त्या म्हणाल्या की, ‘बॉलिवूडच्या नव्या अभिनेत्रींना पाहून माझा जळफळाट होतो. मी आणखी लहान असायला हवे होते.’

त्या पुढे म्हणाल्या की, ‘ ‘बधाई हो’, ‘वीरे दी वेडींग’ यांसारख्या चित्रपटात मला काम करण्याची संधी मिळाली. ही माझ्यासाठी आयुष्याला मिळालेली नवी ‘लीज’ आहे. मला करिअरमध्ये योग्य भूमिका मिळाल्याचा मला आनंद आहे. पण दुसरीकडे मी खूप दुःखी देखील आहे. याचे कारण म्हणजे जर मी लहान असते तर मला अनेक माध्यमांत काम करता आले असते. त्यामुळे मी जेव्हा बॉलिवूडमध्ये नव्या अभिनेत्रींना पाहते तेव्हा माझा जळफळाट होतो.’

नीना गुप्ता ‘बधाई हो’ चित्रपटाबद्दल बोलताना म्हणाल्या की, ‘हा चित्रपट मला योगायोगाने मिळाला. ही भूमिका साकारण्याची संधी मला मिळाली नसती तर मी तिथेच खितपत राहिले असते. चित्रपट हा व्यवसाय आहे. जर आपण एखाद्या भूमिकेत फिट बसत असाल तरच आपल्याला ती भूमिका साकारण्याची संधी मिळते.’

नीना गुप्ता यांनी ‘नजदीकिया’, ‘मंडी’, ‘उत्सव’, ‘डॅडी’, ‘तेरे संग’, ‘दिल से दिया वचन’ अशा अनेक चित्रपटांत काम केले आहे. काही महिन्यांपुर्वी नीना गुप्ता त्यांच्या बोल्ड निर्णयामुळे देखील चर्चेत होत्या. 80 च्या दशकात त्यांनी घेतलेल्या निर्णयाची प्रचंड चर्चा झाली. यासाठी त्यांना अनेक टीकेला सामोरे जावे लागले. पण स्वतंत्र विचारांच्या नीना या जगाची पर्वा न करता आपल्या निर्णयावर ठाम राहिल्या. तो निर्णय होता वेस्ट इंडियाचा माजी क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्ससोबत लग्न न करता त्याच्या मुलीला जन्म देण्याचा. त्यांचा हा निर्णय त्यावेळी क्रांतीकारी होता. आजही नीना तितक्याच बोल्ड आहे. साठी ओलांडल्यानंतरही स्वतःचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करण्याचे धाडस त्यांच्यामध्ये आहे.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !