६० वर्षाच्या ‘या’ अभिनेत्रीचा BAR मध्ये दिसला वेगळाच ‘अंदाज’

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – चित्रपट ‘बधाई हो’ मध्ये आयुष्मानच्या आईची भूमिका करणारी नीना गुप्ताने आपल्या नवीन आणि आकर्षक ‘देसी’ लूकमुळे सगळ्यांना आश्चर्यचकित केले आहे. नीनाने नुकताच सोशल मीडियावर एक फोटो शेयर केला आहे. त्यामध्ये तिने नारंगी कलरची साडी घातली आहे. सोशल मीडियावर फोटो शेयर करत नीनाने लिहिले की, ‘इस शानदार बार में पोज देते हुए’. अभिनेत्री लंडन मध्ये ‘बधाई हो’ चे को- कलाकार गजराज रावसोबत सुट्ट्यांचा आनंद घेते आहे. दोघे दिग्गज कलाकार लवकरच आयुष्मान खुरानासोबत गे-लव स्टोरीवर आधारित ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ मध्ये दिसून येणार आहेत.

https://www.instagram.com/p/B0BITFxlRtT/?utm_source=ig_embed

चर्चा मध्ये नीना गुप्ता

९० च्या दशकात अॅक्ट्रेस नीना गुप्ता खूप चर्चेत आणि विवादांमध्ये आली होती. तिने लग्न न करता एका मुलीला जन्म दिला आणि एकटीच्या दमावर त्या मुलाचे पालन-पोषण केले. या व्यतिरिक्त नीनाने सोशल मीडियावर कामाबद्दल विचारपूस केली त्यावेळी देखील ती खूप चर्चेत आली.

अभिनयाने सगळ्यांना आश्चर्यचकित केले

मागच्या वर्षी प्रदर्शित झालेला चित्रपट ‘बधाई हो’ मधील आपल्या जबरदस्त परफॉर्मेन्समुळे नीनाने सगळ्यांचे मन जिंकले आणि नीना नेहमी सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते.

आरोग्यविषयक वृत्त

You might also like