Video : नेहा कक्करच्या पाणीपुरीमध्ये कारल्याचं पाणी ! सिंगरची झाली फजिती

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   फेमस सिंगर नेहा कक्कर (Neha Kakkar) आणि पंजाबी सिंगर रोहनप्रीत सिंग (Rohanpreet Singh) यांनी दि 24 ऑक्टोबर ( वार शनिवार) रोजी लग्न केलं. अलीकडेच नेहा तिचं हनीमून एन्जॉय करून पुन्हा कामावर परतली आहे. नेहा इंडियन आयडल (Indian Idol) मध्ये जज आहे. असं असलं तरी ती सेटवर कायमच मस्ती करताना दिसत असते. नेहाचा पाणीपुरीवाला एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर अटेंशन घेताना दिसत आहे.

नेहाचा हा व्हिडीओ इंस्टावरून शेअर करण्यात आला आहे. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, नेहा पाणीपुरी खाताना इतर दोन जज विशाल ददलानी (Vishal Dadlani) आणि हिमेश रेशमिया (Himesh Reshammiya) यांनाही विचारते. परंतु ते नकार देतात. नेहा जशी पाणीपुरी खाते लगेच थुंकताना दिसते. पाणीपुरी तोंडात टाकताच तिचे विचित्र हावभाव दिसतात. कारण तिला पाणीपुरी खूप कडू लागते.

नेहाची झालेली फजिती पाहून विशाल आणि हिमेश हसू लागतात. ही पाणीपुरी फिटनेसच्या हिशोबानं बनवली गेली असते. विशाल सांगतो की, त्यात कारलं आणि लिंबाचा रस आहे. नेहाचे हावाभाव पाहून विशाल आणि हिमेश यांना काही हसू कंट्रोल होत नाही. नेहाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.