Video : पती रोहनप्रीतला नेहानं दिलं लेट नाईट सरप्राईज ! Kiss करत म्हणाली – ‘Happy Birthday’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   फेमस सिंगर नेहा कक्कर (Neha Kakkar) आणि पंजाबी सिंगर रोहनप्रीत सिंग (Rohanpreet Singh) हे दि 24 ऑक्टोबर ( वार शनिवार) रोजी लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. अलीकडेच नेहा तिचं हनीमून एन्जॉय करून पुन्हा कामावर परतली आहे. नेहा इंडियन आयडल (Indian Idol) मध्ये जज आहे. त्यांच्या लग्नाला आता एक महिना पूर्ण झाला आहे. आज (मंगळवार दि 1 डिसेंबर 2020) रोहनप्रीत त्याचा 26 वा वाढदिवस साजरा करत आहे. पत्नी नेहानं त्याला एक खास सरप्राईज दिलं आहे. याचा एक व्हिडीओ सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे.

नेहानं तिच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात नेहानं रोहनप्रीतला लेट नाईट सरप्राईज दिल्याचं दिसत आहे. व्हिडीओत तो केक कापताना दिसत आहे. नेहा त्याला किस करत बर्थ डे विश करताना दिसत आहे. दोघंही खूप एन्जॉय करताना दिसून आले.

नेहाचा हा व्हिडीओ सध्या सोशलवर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. नेहाच्या अनेक चाहत्यांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.

नेहा आणि रोहनप्रीत यांच्या नात्याबद्दल बोलायचं झालं तर नेहू द व्याह या गाण्यासाठी दोघं एकत्र आले होते. तेव्हाच दोघांची पहिली भेट होती.

You might also like