Video : नेहा कक्करवरून जीजू रोहनप्रीतसोबत भांडला भाऊ टोनी कक्कर ! व्हायरल झाला व्हिडिओ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – फेमस सिंगर नेहा कक्कर (Neha Kakkar) आणि पंजाबी सिंगर रोहनप्रीत सिंग (Rohanpreet Singh) हे दि 24 ऑक्टोबर (शनिवार) रोजी लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. अलीकडेच नेहा तिचं हनीमून एन्जॉय करून पुन्हा कामावर परतली आहे. नेहा इंडियन आयडल (Indian Idol) मध्ये जज आहे. सध्या रोहनप्रीत आणि नेहाचा भाऊ टोनी कक्कर (Tony Kakkar) यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे जो सध्या व्हायरल होताना दिसत आहे. यात दोघं भांडण करताना दिसत आहेत. जीजू आणि मेहुण्याच्या या क्युट लढाईची सोशलवर चर्चा सुरू आहे.

रोहनप्रीतनं त्याच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात तो टोनी कक्कर सोबत दिसत आहे. बॅकग्राऊंडला टोनीचं नवीन गाणं शोना शोना ऐकू येत आहे. व्हिडीओत दिसत आहे की, रोहनप्रीत मोबाईलमध्ये पत्नीचा फोटो पहात आहे. याचवेळी टोनी देखील मोबाईल घेत नेहाचा फोटो पाहण्याचा प्रयत्न करतो आणि दोघांचं भांडण होतं. हे भांडण खूप मजेदार आहे.

लढाई करतानाही दोघांचा मजेदार अंदाज चाहत्यांना खूप आवडला आहे. रोहनप्रीतनं मेहुणा टोनीच्या नव्या गाण्याच्या प्रमोशनसाठी हा व्हिडीओ तयार केला आहे. रोहनप्रीतनं हा व्हिडीओ शेअर करत छान कॅप्शनही दिलं आहे आणि टोनीला या गाण्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. सध्या रोहनप्रीत आणि टोनी यांचा हा व्हिडीओ सोशलवर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे.

You might also like