भाड्याच्या एका लहान घरात रहायची ‘सिंगर’ नेहा कक्कर, त्याच शहरात घेतला ‘आलिशान’ बंगला

पोलीसनामा ऑनलाइन – नेहा कक्कर बॉलिवूडमधील प्रसिद्ध प्लेबॅक सिंगर आहे. इंडियन आयडल 2 मध्ये ती स्पर्धक म्हणून आली होती. अलकीडेच ती इंडियन आयडल 11 ची जज झाली होती. नुकताच हा शो संपला आहे. तिनं आपल्या ध्येयासाठी खूप मेहनत घेतली आहे. नेहानं तिच्या जुन्या घराचा आणि आताच्या घराचा फोटो शेअर करत आपल्या जुन्या आणि लहानपणीच्या दिवसांची आठवण काढली आहे. हा फोटो शेअर करताना नेहा खूप इमोशनल झाली होती. नेहाची ही पोस्ट क्षणातच सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसली.

नेहा कक्करं इंस्टावरून ऋषिकेशमधील आपल्या बंगल्याचा आणि आधीच्या जुन्या घराचा फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करताना नेहा म्हणाली, “हा माझा बंगला आहे जो ऋषिकेशमध्ये आहे. दुसरा फोटो त्या घराचा आहे जिथे माझा जन्म झाला आहे. या घरात आमचं कुटुंब रहात होतं. आईनं घरात एक टेबल ठेवला होता जे आमचं किचन होतं. आम्ही त्या घरात भाड्यानं रहात होतो. जेव्हा मी शहरातील माझा बंगला पाहते तेव्हा मी भावूक होते.” आपल्या पोस्टमध्ये तिनं आई-वडिल, माता राणी (देवी) आणि चाहत्यांना धन्यवाद दिले आहेत.

https://www.instagram.com/p/B9bCoNxHHKT/

लुकबद्दल बोालायचं झालं तर नेहानं ब्लू कलरचा ड्रेस घातला आहे. यात नेहा खूपच सुंदर दिसत आहे. दोन्ही घरांच्या बाहेर तिनं सेम ड्रेस घालून फोटो काढला आहे. नेहाची ही पोस्ट पाहिल्यानंतर चाहत्यांनी तिच्या या अचीवमेंटचं कौतुक केलं आहे. नेहाच्या चाहत्यांनी या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. आदित्या नारायण (इंडियन आयडल 11 चा अँकर) यानंही या पोस्टवर कमेंट केली आहे. आदित्य म्हणतो, “दृढ निश्चय आणि मेहनतीनं सारं काही मिळवता येतं. याचं जिवंत उदाहरण तू आहेस.” सिंगर विशाल ददलानीनंही यावर कमेंट केली आहे. विशाल म्हणतो, “तुझा गर्व वाटतो. मोठा, कठिण परंतु आनंददायी प्रवास. खूप प्रेरणादायक. बिग हग.”

https://www.instagram.com/p/B8f6lIAnCt9/

https://www.instagram.com/p/B8VmuHbn7X9/

https://www.instagram.com/p/B7qRdc9HY4_/

https://www.instagram.com/p/B7X-9cLnJvG/

https://www.instagram.com/p/B7VYR3wnZnK/

https://www.instagram.com/p/B7AK5QEH4Hd/

https://www.instagram.com/p/B62FxOOHOiF/

https://www.instagram.com/p/B5O8PO-nnBx/