‘खिलाडी’ अक्षयपेक्षा सिनेमातील रिअल ‘लक्ष्मी’वर फिदा झाले लोक ! ‘या’ मराठी अभिनेत्यानं साकारलीय भूमिका

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –    बॉलिवूड स्टार अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) यांचा बहुचर्चित सिनेमा लक्ष्मी (Laxmii) हा अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 9 नोव्हेंबर रोजी हा सिनेमा डिज्नी प्लस हॉटस्टारवर रिलीज झाला आहे. परंतु चाहत्यांना हा सिनेमा फारसा भावला नसल्याचं दिसत आहे. अनेकांनी सिनेमाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. सिनेमा पाहून वेळ वाया घालवल्यासारखं वाटत असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. त्यातच आयएमडीबी (IMDb) रेटिंगवरदेखील लक्ष्मी अपयशी ठरला आहे. सिनेमाला 10 पैकी 2.6 रेटिंग मिळाली आहे. कंचना (Kanchana) या मूळ तमिळ सिनेमाचा तो रिमेक आहे. चाहते नाराज जरी झाले असले तरी एका मराठी अभिनेत्याच्या अभिनयानं आणि रोलनं चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. सोशलवर त्याचं जोरदार कौतुक होताना दिसत आहे.

ज्या भूमिकेची खूप चर्चा आहे ती भूमिका आहे सिनेमात रिअल लक्ष्मीची. ही भूमिका अभिनेता शरद केळकर (Sharad Kelkar) यानं साकारली आहे. आपल्या सादरीकरणानं त्यानं चाहत्यांचं मन जिंकलं आहे. लोकांना सिनेमा आवडला नाही, परंतु लक्ष्मीची भूमिका साकारणारा शरद मात्र हिट ठरताना दिसत आहे.

ट्विटरवर शरद केळकरचं जोरदार कौतुक होताना दिसत आहे. विशेष म्हणजे शरद केळकरचा रोल केवळ 15 ते 20 मिनिटांचाच आहे. एकीकडे अक्षयच्या अ‍ॅक्टिंगला लोक ओव्हरअ‍ॅक्टिंग म्हणत आहेत, तर शरद केळकरच्या अभिनयाचं मात्र कौतुक करत आहेत. ट्विटरवर अनेकांनी पोस्ट शेअर करत आपल्या भावना मांडल्या आहेत.