सिंगर अदनान सामीची ‘वापसी’ ! नव्या गाण्यात दिसणार ‘अदा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – प्रसिद्ध गायक अदनान सामी एका लव साँगमधून वापसी करणार आहे. या गाण्यात त्याच्यासोबत अभिनेत्री अदा शर्मा दिसणार आहे. कुणाल वर्मानं या गाण्याला संगीत दिलं आहे. कुणालनं तुम ही आना आणि मलंग सिनेमाचं शीर्षकगीत लिहिलं आहे. एक गैरफिल्मी गाणं तू याद आया गाण्यातून अदनान सामी वापसी करणार आहे.

कुणालानं याबाबत बोलताना सांगितलं की, “हे गाणं दीर्घकाळापासून कंपोज केलं गेलं होतं. गेल्या काही दिवसांपासून हे गाणं माझ्या डोक्यात होतं आणि मी हे गाणं रेकॉर्ड केलं होतं. मी हे गाणं लिहलं आहे. जेव्हा मी टी सीरीजला हे गाणं ऐकवलं तेव्हा त्यांना खूप आवडलं आणि त्यांनी मला हे गाणं पूर्ण करण्यास सांगितलं.

या महिन्याच्या अखेरीस गाणं रिलीज होणार
लिफ्ट करा दे आणि तेरा चेहरा यांसारख्या गाण्यांसाठी फेमस असणारे अदनान सामी म्हणाला, “भूषण, टी सीरीज आणि माझं 20 वर्ष जुनं नातं आहे. सोबत काम करण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून आमचं बोलणं सुरू आहे.”

https://www.instagram.com/p/B8OR-RWl2sW/?utm_source=ig_embed

पुढे बोलताना अदनान म्हणतो, “मलाही असं वाटलं की आता आराम खूप झाला. लोकांनी मला खूप काही दिलं आहे जे माझ्याकडं उधार आहे. आता त्यांना काही देण्याची माझी बारी आहे. तू याद आया हे गाणं म्हणजे एवढी वर्षे मला एवढं प्रेम दिल्याबद्दल त्यांना धन्यवाद म्हणण्याची माझी पद्धत आहे.”