Bollywood News | रणवीर आणि दीपिकाच्या आलिशान घराची सर्वत्र चर्चा; व्हिडिओ होत आहे व्हायरल

पोलीसनामा ऑनलाइन – Bollywood News | बॉलीवुडमधील जबरदस्त हिट कपल म्हणजे रणवीर आणि दीपिका (Ranveer And Deepika) हे आता त्यांच्या स्वप्नातील नवे घर बांधत आहे. मेहनतीच्या जोरावर अभिनेत्री दीपिका पादुकोण (Actress Deepika Padukone) आणि अभिनेता रणवीर सिंग (Actor Ranveer Singh) या दोन्ही कलाकरांनी मनोरंजन क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. त्यांच्या चित्रपटांमुळे आणि वैयक्तिक आयुष्यामुळे ते चर्चेत असतात. आता त्यांच्या नव्या घरामुळे ते चर्चेत आले आहेत. (Bollywood News)

अभिनेता शाहरुख खानच्या (Actor Shah Rukh Khan) मन्नत (Mannat) जवळ हे कपल आपले आलिशान घर बांधत आहेत. त्यांच्या या घराची झलक सोशल मीडियावर बघायला मिळत आहे. या घराचे अद्याप बांधकाम सुरु असून काम जोरदार सुरु असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. एका इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन ही व्हिडीओ पोस्ट करण्यात आली असून या व्हिडिओखाली ‘मस्तानी कपलचे स्वप्नातील घर पहा’ असे लिहिण्यात आले आहे. दीप-वीर (Deep-veer) चे अनेक चाहते या व्हिडिओखाली कमेंट करत त्यांना शुभेच्छा देत आहेत. (Deepika Padukone New Home)

मागील काही महिन्यापूर्वी दीपिका आणि रणवीर या जोडीने बँडस्टँडच्या सागर रेशम इमारतीमधील 16,17,18 आणि 19 वा मजला विकत घेतल्याची बातमी आली होती. या कपलच्या मुंबईमधील (Mumbai) प्रॉपर्टीची किंमत 119 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. स्वत: चे असे घर बांधणे हे रणवीर आणि दीपिकाचे स्वप्न असल्याचे बोलले जात आहे. या घराच्या बांधकांमाकडे ते दोघे जातीने लक्ष देत असल्याचेही समोर येत आहे. मागच्या आठवड्यात हे कपल कंस्ट्रक्शन साईटवर स्पॉट झाले होते. यावेळी त्यांच्यासोबत रणवीरचे पालकही असल्याचे दिसून आले होते.

अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पादूकोन दोघेही यशाच्या शिखरावर असून त्यांच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहेत. रणवीरचा लवकरच अभिनेत्री आलिया भट्ट (Actress Alia Bhatt) सोबत ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ (Rocky Aur Rani Kii Prem Kahaani) या चित्रपटात झळकणार आहे. तसेच दीपिका लवकरच ‘जवान’ (Jawan) या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तिचा ‘फायटर’ (Fighter) चित्रपट 2024 मध्ये प्रदर्शित होणार आहे. (Bollywood News)

Web Title : Bollywood News | bollywood actress deepika padukone and ranveer singh new home bandra video viral

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Major General Smita Devrani and Brigadier Amita Devrani Receive Prestigious National Florence Nightingale Awards for Exemplary Service in Nursing

Unveiling the Truth: Atal Bihari Vajpayee, the Right Man in the Right Party

C-DAC Collaborates with Bharati Vidyapeeth (Deemed to be University) College of Engineering, Pune, to Introduce New Technical Courses

Lonavla Residents Duped in Chardham Yatra Scam: 37 Victims Seek Justice

Autorickshaw Driver Arrested for Stealing Temple Bell: Kondhwa Police Crack the Case

India Takes Flight: Pioneering Female Representation among Commercial Pilots Globall