bollywood News | करीना कपूर खानने पुन्हा दिली GOOD NEWS, तिसर्‍या मुलाचा केला उल्लेख

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुड (bollywood) अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) आता दोन मुलांची आई झाली आहे. परंतु नुकतेच तीने आपल्या तिसर्‍या मुलाचा उल्लेख करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. सोशल मीडिया (Social Media) वर बेबो खुप अ‍ॅक्टिव्ह असते आणि आपल्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफबाबत चाहत्यांना अपडेट देत असते. 21 फेब्रुवारीला दुसर्‍यांदा आई झाल्यानंतर तिने आपल्या तिसर्‍या बाळाची अनाऊसमेंट करून लोकांना हैराण केले आहे. तिने आपल्या तिसर्‍या बाळाचे नाव सुद्धा चाहत्यांसोबत शेयर केले आहे. bollywood kareena kapoor khan announces book pregnancy bible shares pic of her third child

करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) आपल्या चाहत्यांसोबत आपला प्रत्येक आनंद शेयर करते. करीनाने आता चाहत्यांना आपल्या पुस्तकाची (Pregnancy Book) अनाऊसमेंट केली आहे. या पुस्तकात ती आपला प्रेग्नंसीचा अनुभव शेयर करत आहे. विशेष म्हणजे करीनाने या पुस्तकाला आपले तिसरे मुल म्हटले आहे आणि त्यास ’बायबल’ नाव दिले आहे.

करीनाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेयर केला आहे, ज्यामध्ये ती किचनमध्ये उभी आहे आणि बेकिंग ट्रेमधून आपले बुक काढते. करीनाने व्हिडिओ शेयर करत लिहिले की – हा माझा प्रवास आहे. माझ्या दोन्ही प्रेग्नंसी आणि तिसरी प्रेग्नंसी बुक बायबल. काही चांगले दिवस होते तर काही वाईट. काही दिवशी मी कामावर जाण्यास उतावळी होते, तर काही दिवस बेडवरून उठणे सुद्धा अवघड होते. हे पुस्तक माझ्या हृदयाच्या जवळ आहे, कारण यामध्ये मी माझ्या दोन्ही प्रेग्नंसीच्या दरम्यान फिजिकल आणि इमोशनल अनुभवाबाबत लिहिले आहे.

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

करीनाने आपल्या वैयक्तिक अनुभवांसह प्रोफेशनल डॉक्टर्स आणि एक्सपर्टचा सल्ला सुद्धा नमूद केला आहे. ज्यामुळे दुसर्‍या प्रेग्नंट महिलांना मदत होईल.

तिने पुढे लिहिले, यास देशातील स्त्री रोग आणि प्रसूती रोग तज्ज्ञांच्या गव्हर्निंग बॉडी FOGSI ने मान्यता दिली आहे.
सोबतच हे लिहिण्यासाठी माझ्या पर्सनल डॉक्टरांचे सुद्धा मोठे योगदान राहिले आहे.
मी हे पुस्तक शेयर करून एक्सायटेड आणि नर्व्हस दोन्ही आहे.

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Web Title : bollywood News |  bollywood kareena kapoor khan announces
book pregnancy bible shares pic of her third child

हे देखील वाचा

Anti Corruption Trap | साडे सात लाख रुपयांच्या लाच प्रकरणी पोलीस निरीक्षकासह
2 अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात; राज्य पोलीस दलात खळबळ

पोलीस निरीक्षक संपत पवार यांची या पूर्वी पुण्यातील गुन्हे शाखेत आणि
दत्तवाडी पोलीस ठाण्यात नोकरी झाली आहे

Pune Navale Bridge Accident | पुण्यातील नवले पुलावर पुन्हा मोठा अपघात;
ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने 8 वाहनांचे नुकसान

Kappa variant | डेल्टानंतर आता आला कोरोनाचा नवीन कप्पा व्हेरिएंट, जाणून घ्या याची लक्षणे आणि कसे पडले याचे नाव