दिल जीत लिया ! रस्त्यावरील महिलेला मलायका अरोरानं दिले पैसे, ‘ती’ झाली एकदम ‘खुश’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड स्टार मलायका अरोरा नेहमीच आपल्या हॉट फोटोंमुळं किंवा अर्जुनसोबतच्या नात्यामुळं चर्चेत येताना दिसत असते. आपल्या स्टाईल आणि फॅशननं चाहत्यांना भुरळ घालणाऱ्या मलायकाचे काही फोटो समोर आले आाहेत जे सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत. हे फोटो पाहून तुम्हीही मलायकाच्या प्रेमात पडाल. हा फोटो मलायकाच्या लुकचता नाही तर वेगळाच आहे.

अलीकडेच मलायका मुंबईतील वांद्र्यात डिनर डेटसाठी आली होती. यावेळी जेव्हा रेस्टॉरंटमधून बाहेर पडली तेव्हा तिला एक गरीब महिला काहीतरी घेताना दिसली. यावेळी मलायकानं त्या बाईला आर्थिक मदत केली. त्या बाईला पैसे देताना मलयाका दिसून आली. मलायका त्या गरीब बाईला मदत करतानाचे फोटो समोर आल्यानंतर लगेच सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत.

मलायकाचा हा हेल्पिंग हँडवाला अंदाज साऱ्यांनाच आवडला आहे. सोशल मीडियावर सध्य मलायकाची जोरदार स्तुती होताना दिसत आहे. मलायकाच्या अनेक चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. तिच्या या फोटोंची खूप चर्चा होताना दिसत आहे. मलायकाच्या हॉट फोटोंना ज्याप्रमाणे प्रतिसाद मिळतो त्याचप्रमाणे तिच्या या फोटोंनाही प्रतिसाद मिळत आहे.

https://www.instagram.com/p/B9Lt2IJjWM0/