Bollywood News | बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्याला पाहण्यासाठी गुजरातमध्ये चाहत्यांची उसळली गर्दी

पोलीसनामा ऑनलाईन – Bollywood News | आपल्या लाडक्या अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते काही करायला तयार असतात. ते आपल्या लाडक्या अभिनेत्याच्या घराबाहेर चातकासारखी वाट बघत असतात. बॉलिवूडमध्ये (Bollywood News) असे काही कलाकार आहेत त्यांची झलक पाहण्यासाठी चाहते त्यांच्या घराबाहेर वाट बघतात. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) , शाहरुख खान (Shah Rukh Khan), सलमान खान (Salman Khan), अक्षय कुमार (Akshay Kumar) या अभितेत्यांची झलक पाहण्यासाठी चाहते मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे यामध्ये गुजरातमधील (Gujrat) अहमदाबाद या ठिकाणी बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनला (Karthik Aryan) भेटण्यासाठी चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

‘भूलभुलैया 2’च्या (Bhool Bhulaiyaa 2) यशानंतर कार्तिक सध्या ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटात काम करत आहे. या चित्रपटात त्याच्याबरोबर कियारा अडवाणीदेखील (Kiara Advani) आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी कार्तिक अहमदाबाद शहरात गेला असताना त्याला पाहण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. चाहत्यांच्या गराड्यात कार्तिक अडकला होता. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कार्तिक कियाराचा हा चित्रपट एक संगीतमय प्रेमकथा असणार आहे.

मराठमोळा दिग्दर्शक समीर विद्वांस (Director Sameer Vidwans) या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे.
याआधी समीरने नाटक, चित्रपट, वेबसीरिज या माध्यमांमध्ये काम केले आहे.
या चित्रपटाच्या निमित्ताने तो पहिल्यांदाच हिंदीत झळकणार आहे. सुप्रसिद्ध निर्माते साजिद नाडियाडवाला
(Sajid Nadiadwala), आणि शरीन मंत्री केडिया (Shareen Mantri Kedia) हे ‘नमाह पिक्चर्स’च्या
सहाय्याने या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत.

Web Title :-  Bollywood News | satyaprem ki katha actor kartik aryan spotted in ahmedabad fans want to see him

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

T20 World Cup 2022 | श्रीसंतच्या मुलीने विराट कोहलीसारखा मारला शॉट, पहा व्हिडिओ

Satej Patil | पडद्यामागे काय घडले, ते आता बच्चू कडूंनी बाहेर आणावे – सतेज पाटील