प्रेमात अपयशी ठरलेल्या तरुणांना सारानं दिला ‘सल्ला’ (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सैफ अली खानची मुलगी आणि अभिनेत्री सारा अली खानने आपल्या स्वभावाने लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. सारा सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते. अलीकडे साराने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती प्रेक्षकांना नमस्ते करुन ‘वॉक विथ सारा’ असे म्हणत चालत आहे. सारा एका पार्कमध्ये व्हिडिओ शूट दरम्यान चाहत्यांना दगड दाखवते आणि त्याबद्दल सांगते. व्हिडिओमधील जो दगड दिसत आहे तो अतिशय महत्वाचा आहे. याबाबत मार्गदर्शकांकडून माहिती घेत सारा म्हणते की, ‘एका इंग्रजी चित्रपटात सिंड्रेला या दगडावर चढली होती.’

हे सांगत असताना सारा स्वत: त्या दगडावर बसते. यानंतर ती समोर बांधलेला पूल दाखवते आणि म्हणते की, ‘या पूलावर स्पायडर मॅन चित्रपटाचे शूटिंग करण्यात आले आहे. येथे, स्पायडर मॅनने आपल्या गर्लफ्रेंडला या पुलाच्या आसपास सोडले होते. जर तुम्हाला गर्लफ्रेंडला विचारायचे आहे की, तिला तुमच्याशी लग्न करायचे आहे की नाही आणि जर तिचा नकार आल्यास तुम्ही यामध्ये उडी मारण्याची रिस्क घेऊ नका.’

नुकताच सारा अली खान आणि कार्तिक आर्यनचा आगामी चित्रपट ‘लव्ह आजकल 2’ चा ट्रेलर रिलीज झाला आहे. याला लोकांचा खूप मिळाला आहे. इतकेच नाही तर स्वत: सैफ अली खाननेही याला OK…Ok म्हटले आहे. सैफ म्हणाला की, ‘पूर्वीचे चित्रपट यापेक्षा चांगले होते’. ‘लव्ह आजकल 2’ मध्ये रणदीप प्रेम गुरूच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘लव्ह आजकल’ हा रोमँटिक-विनोदी चित्रपट 2009 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात सैफ अली खान, दीपिका पादुकोण आणि ऋषी कपूर मुख्य भूमिकेत होते.

 

फेसबुक पेज लाईक करा – 

You might also like