प्रसिद्ध फॅशन डिझायनर ‘वेंडेल रॉड्रिक्स’चं अचानक निधन, ‘मलायका-अनुष्का’नं शेअर केल्या ‘इमोशनल’ नोट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – एक निपुन फॅशन डिझायनर आणि पद्मश्रीनं सन्मानित वेंडेल रॉड्रिक्सच्या अचानक निधनानं फॅशन आणि बॉलिवूड इंडस्ट्री हादरली आहे. 12 फेब्रुवारी 2020 रोजी गोव्यातील कोळवले येथे राहत्या घरी वेंडेलनं अखेरचा श्वास घेतला. 59 वर्षीय वेंडल LGBTQ अ‍ॅक्टीविस्ट होता. त्याच्या अचानक जाण्यानं फॅशन आणि फिल्म इंडस्ट्री शॉक झाली आहे.

बॉलिवूडमधील अनेक कलाकरांनी वेंडेल रॉड्रिक्स सोबत काम केलं आहे. मलायका अरोरा, अनुष्का शर्मा अशी काही नावं सांगता येतील. अनुष्का आणि मलायका यांनीही वेंडेलच्य जाण्याचं दु:ख व्यक्त केलं आहे. त्यांनी इमोशनल नोट शेअर करत वेंडेलसोबतच्या प्रवासाचे त्यांचे अनुभव सांगितले आहेत. फॅशन इंडस्ट्रीत त्यानं कसे बदल घडवले हेही त्यांनी सांगितलं आहे.

वेंडेलला भारत सरकारनं 2014 मध्ये पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. एक निपुण फॅशन डिझायनर सोबतच वेंडेल समलिंगींच्या हक्कासाठी लढणारा कार्यकर्ता आणि लेखक होता. 2012 साली वेंडेलनं Moda Goa : History and Style हे पुस्तक लिहिलं. त्यानंतर त्यानं ग्रीन रूम नावाचं आत्मचरित्र लिहिलं. 2017 साली Poskem : Goans in the Shadowas हा सिनेमा प्रदर्शित झाला. हा सिनेमा गोव्यातील दत्तक मुलांच्या कल्पित कथेवर आधारीत होता. 2002 साली वेंडेलनं जेरोम मॅरेल (Jerome Marrel)सोबत पॅरिसमध्ये लग्न केलं.

काही दिवसांपूर्वी प्रियंका चोपडाच्या डीप नेक ड्रेसवर कमेंट केल्यानं वेंडेल चर्चेत आला होता वेंडेल रॉड्रिक्सनं प्रियंकाची खिल्ली उडवत नेक लाईनच्या लांबीला लॉस एंजेलिस ते क्युबा असं महटलं होतं. यानंतर अनेकांनी रॉड्रिक्सला ट्रोल केलं. यानंतर रॉड्रिक्सनं पुन्हा कमेंट करत सविस्त आपलं म्हणणं सांगितलं. अनेकांनी प्रियंकाच्या बॉडी शेमिंगबद्दल रोड्रिक्सला ट्रोल केलं. परंतु तो ड्रेस शेमिंग बद्दल बोलत होता असं त्यानं स्पष्ट केलं होतं.