Nora Fatehi Dance Video : नोरा फतेहीनं पुन्हा एकदा केला जबरदस्त डान्स ! व्हायरल झाला व्हिडीओ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड ॲक्ट्रेस, डान्सर नोरा फतेही (Nora Fatehi) आपल्या डान्ससाठी खूपच फेमस आहे. नोरा अनेकदा तिचे डान्स व्हिडीओ सोशलवरून शेअर करत असते जे व्हायरल होताना दिसत असतात. याशिवाय आपल्या बोल्ड फोटो आणि व्हिडीओंमुळंही नोरा चर्चेत येत असते. सध्या नोराचा एक व्हिडीओ समोर आला आहे जो जोरदार व्हायरल होत आहे. यात नोराचा जबरदस्त डान्स पाहायला मिळत आहे.

नोराचा जो व्हिडीओ समोर आला आहे त्यात ती डान्सर तेजस आणि इश्प्रीत सोबत काही स्टेप्स करत थिरकताना दिसत आहे. गाण्यालाही ती खूप एन्जॉय करताना दिसत आहे. मरजावां सिनेमातील एक तो कम जिंदगानी या गाण्यावर नोरा डान्स करत आहे. नेहमीप्रमाणेच तिंन जबरदस्त मुव्स केल्या आहेत.

सध्या नोराचा हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. काहींनी हा व्हिडीओ शेअरही केला आहे. चाहत्यांची तिच्या डान्सचं कौतुक केलं आहे.

नोराच्या वर्कफ्रंटबद्दल बोालायचं झालं तर लवकरच नोरा अजय देवगण स्टारर भुज द प्राईड ऑफ इंडिया या सिनेमात दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच ती स्ट्रीट डान्सर थ्री डी सिनेमात दिसली होती. नोरानं बॉलिवूडमध्ये अनेक आयटम नंबर केले आहेत. साकी साकी, दिलबर, एक तो कम जिंदगानी, कमरिया, गरमी हे तिचे आयटम साँग खूपच गाजले आहेत. नोरा आपल्या डान्ससाठी विशेष ओळखली जाते. रोअर : टायगर्स ऑफ द सुंदरबन्स या सिनेमातून तिनं बॉलिवूड डेब्यू केला होता. याशिवाय क्रेझी कुक्कड फॅमिली या सिनेमातही तिनं काम केलं आहे. हे दोन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर खास काही चालले नाहीत.