नोरा फतेहीला घ्यायचाय बदला ! विचित्र पोस्ट पाहून चाहते हैराण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड ॲक्ट्रेस, डान्सर नोरा फतेही (Nora Fatehi) आपल्या डान्ससाठी खूपच फेमस आहे. नोरा अनेकदा तिचे डान्स व्हिडीओ सोशलवरून शेअर करत असते जे व्हायरल होताना दिसत असतात. याशिवाय आपल्या बोल्ड फोटो आणि व्हिडीओंमुळंही नोरा चर्चेत येत असते. सध्या नोराची अशी एक पोस्ट समोर आली आहे ज्यामुळं चाहते हैराण झाले आहेत. तिला कसला तरी बदला घ्यायचा आहे, कोणाचा आणि का घ्यायचा आहे हे मात्र अद्याप काही कळालेलं नाही.

नोरानं तिच्या इंस्टा स्टोरीला एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिनं काहीसं विचित्रच लिहिलं आहे. नोरा यात लिहिते की, मी पश्चाताप करण्यावर जास्त विश्वास नाही ठेवत. मी बदला घेणं जास्त योग्य समजते. माझ्यावर विश्वास ठेवा हे होणारच.

नोराच्या या पोस्टमध्ये आणखी काही सविस्तरपणे लिहिल्याचं दिसत नाही. त्यामुळं चाहते हैराण झाले आहेत. त्यांचा गोंधळ होत आहे की, नोरा नेमकं काय आणि का म्हणत आहे.

नोराची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. काहींनी तर याचे स्क्रीनशॉट काढून सोशलवर शेअर केले आहेत.

नोराच्या वर्कफ्रंटबद्दल बोालायचं झालं तर लवकरच नोरा अजय देवगण स्टारर भुज द प्राईड ऑफ इंडिया या सिनेमात दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच ती स्ट्रीट डान्सर थ्री डी सिनेमात दिसली होती. नोरानं बॉलिवूडमध्ये अनेक आयटम नंबर केले आहेत. साकी साकी, दिलबर, एक तो कम जिंदगानी, कमरिया, गरमी हे तिचे आयटम साँग खूपच गाजले आहेत. नोरा आपल्या डान्ससाठी विशेष ओळखली जाते. रोअर : टायगर्स ऑफ द सुंदरबन्स या सिनेमातून तिनं बॉलिवूड डेब्यू केला होता. याशिवाय क्रेझी कुक्कड फॅमिली या सिनेमातही तिनं काम केलं आहे. हे दोन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर खास काही चालले नाहीत.