सुशांतच्या निधनावर सोनू सूदनं दिली प्रतिक्रिया, म्हणाला – ‘ठराविक लोकांना जबाबदार ठरवणं योग्य नाही’ !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर आता घराणेशाहीचा मुद्दा जोरावर आहे. आतापर्यंत अनेक कलाकारांनी या मुद्द्यावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. यावर आता अभिनेता सोनू सूदनं त्याची प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाला सोनू सूद ?

एका मुलाखीत बोलताना सोनू म्हणाला, “सुशांतच्या निधनासाठी काही ठराविक लोकं, बडे स्टार किंवा स्टार किड्स्ला जबाबदार ठरवणं योग्य नाही. इंडस्ट्रीत असे अनेक लोक आहेत ज्यांनी अनकेांना जीवन दिलं आहे. राहिलं आता फॅक्टची गोष्ट तर तुम्ही येणाऱ्या वेळेलाच निर्णय घेऊ द्या की, एखादा बरोबर आहे किंवा चुकीचा आहे.”

बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत यानं रविवारी (दि 14 जून 2020) गळफास घेऊन आत्महत्या केली आणि जगाचा निरोप घेतला. अचानक समोर आलेल्या या घटनेनं साऱ्यांनाच हादरून सोडलं. अजूनही लोक या धक्क्यातून सावरलेले नाहीत. 34 वर्षीय सुशांत ब्रांद्र्याच्या माऊंट ब्लांच बिल्डींगच्या सहाव्या मजल्यावर डुप्लेक्स अपार्टमेंटमध्ये राहत होता. त्याच्या निधानानंतर आता सोशलवर इनसाईडर्स-आउटसईडर्स, नेपोटीजम, बॉलिवूडमधील पॉलिटीक्स अशी अनेक मुद्द्यावर चर्चा रंगली आहे आणि वादही होत आहेत.