अभिनेत्री नुसरतचा ‘छोटे छोटे पेग मार’ गाण्यातील ‘अवतार’ पाहून वडिलांनी विचारला होता ‘हा’ प्रश्न

पोलीसनामा ऑनलाईन टीम : 2011 साली आलेल्या प्यार का पंचनामा या सिनेमातून लाईमलाईटमध्ये आलेल्या नुसरत भरूचा हिनं अलीकडेच तिचा 35 वा वाढदिवस साजरा केला. प्यार का पंचनामा या सिनेमाआधीही तिनं अनेक सिनेमा आणि मालिकेत काम केलं आहे. परंतु या सिनेमातून तिला खूपच ओळख मिळाली. यानंतर तिनं प्यार का पंचनामा 2, सोनू के टीट्टू की स्वीटी आणि ड्रीम गर्ल अशा सिनेमात काम केलं. हे तीनही सिनेमे हिट झाले आहेत. सोनू के टीट्टू की स्वीटी सिनेमातील छोटे छोटे पेग मार या गाण्याचा एक मजेदार किस्सा नुसरतनं सांगितला आहे.

सोनू के टीट्टू की स्वीटीमधी छोटे पेग गाण्यात नुसरतचा रेड ड्रेस खूपच हॉट होता. थाय हाय स्लिट साईड कट स्कर्ट आणि ब्रालेटमध्ये ती प्रचंड हॉट दिसत होती. हे गाणंही खूप गाजलं होतं. मुलाखतीत बोलताना नुसरत म्हणाली, “हे गाणं रिलीज झालं तेव्हा मी घरी सांगितलं नव्हतं. कारण मला नव्हतं माहित ते काय बोलतील काय विचार करतील. मी त्यांना हे गाणं दाखवल नव्हतं. परंतु एकदा जेव्हा मी प्रमोशनवरून घरी आले तेव्हा ते हेच गाणं पहात होते. मी हळूच आत जात होते एवढ्यात पप्पा आले आणि म्हणाले, का तू ब्रा घातली आहेस ? मी खूप जोरात हसले. मी विचारच केला नाही की, त्यात मी फक्त ब्रालेट घातली आहे. मी विचार करत होते की, या सगळ्यापासून कसं वाचू.

नुसरतच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर लवकरच ती तुर्रम खान या सिनेमात दिसणार आहे. तिनं आयुष्मान खुरानाच्या ड्रिमगर्ल या सिनेमात काम केलं आहे. याशिवाय तिनं कल किसने देखा, ताजमहाल, लव्ह सेक्स और धोका, पंचनामा 2, सोनू के टीट्टू की स्वीटी अशा अनेक सिनेमात काम केलं आहे. प्यार का पंचनामा या सिनेमानं तिला खूपच लोकप्रियता मिळाली.