नुसरत जहाँ-निखिल जैनमध्ये नाही सर्वकाही OK, यश दासगुप्ताला डेट करतेय अभिनेत्री

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बंगाली अभिनेत्री आणि तृणमूल कॉंग्रेसच्या खासदार नुसरत जहांने ( nusrat jahan) 2019 मध्ये व्यावसायिक निखिल जैनशी (Nikhil Jain) लग्न केले होते. दोघांच्या लग्नाची खूप चर्चा होती. पण आता बातमी आहे की, नुसरत जहां आणि निखिल जैन यांच्या वैवाहिक जीवनात सर्व काही ठीक नाही. दोघांमध्ये मतभेद सुरु असल्याच्या बातम्या सुरु आहेत. इतकेच नव्हे तर निखिल जैन यांच्यापासून विभक्त झाल्याच्या बातम्यांसह नुसरत जहाचा एसओएस कोलकाताचा सह-कलाकार यश दासगुप्तासोबत जवळीक वाढत असल्याच्या बातम्याही समोर येत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार नुसरत जहां सध्या यश दासगुप्ताला डेट करत आहे. या वृत्तांवर आता अभिनेत्रीने देखील उघडपणे प्रतिक्रिया दिली आहे.

नुसरत जहांसोबत यशनेही या बातमीला दुजोरा दिला आहे. अभिनेत्रीने एका मुलाखतीत सांगितले की, आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाहीरपणे बोलणे तिला आवडत नाही. लोक नेहमीच मला लक्ष्य करतात. त्यामुळे मला या विषयावर कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नाही. चांगले किंवा वाईट हे तिचे वैयक्तिक आयुष्य आहे आणि तिला याबद्दल बोलण्याची इच्छा नसल्याचे नुसरतने स्पष्टपणे सांगितले. म्हणजेच नुसरत जहांने अद्याप तिचे लग्न चांगले चालले आहे की नाही किंवा यश दासगुप्ताला डेट करत आहे की नाही हे स्पष्ट केले नाही.

नुकताच नुसरत जहां यश दासगुप्तासोबत राजस्थानमध्ये सुट्ट्या घालविण्यास देखील गेली होती. त्यानंतर या मुद्दा आणखीनच वाढला. नुसरत जहांशी असलेल्या संबंधांच्या वृत्तावर प्रतिक्रिया व्यक्त करताना यश म्हणाला कि, नुसरतच्या वैयक्तिक आयुष्यात काय चालले आहे याची मला कल्पना नाही. यासह तो म्हणाला की, कोणी सुटीसाठी राजस्थानला जाऊ शकत नाही का ? जर ही बाब नुसरतच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित असेल तर प्रश्नही तिला विचारले पाहिजेत.