Coolie No. 1 : जेव्हा सेटवर वरुणमुळं डेविड धवननं सारा अली खानवर काढला होता ‘राग’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड स्टार वरुण धवन (Varun Dhawan) आणि सारा अली खान (Sara Ali Khan) सध्या त्यांचा आगामी सिनेमा कुली नंबर 1 (Coolie No. 1) मुळं चर्चेत आहेत. हा सिनेमा अ‍ॅमेझॉन प्राईम (Amazon Prime) वर ख्रिसमस डे ला म्हणजेच 25 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. शनिवारी (दि 28 नोव्हेंबर) सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. आता सारानं काही सिनेमाबद्दल काही खुलासे केले आहेत. सेटवर डायरेक्टर डेविड धवन त्यांचा मुलगा वरुणवर खूप रागावले होते. परंतु सर्व राग त्यांनी माझ्यावर काढला असं सारानं सांगितलं आहे.

कुली नंबर 1 च्या व्हर्च्युअल ट्रेलर लाँचिंग दरम्यान सारा म्हणाली, मै तो रस्ते से जा रहा था गाण्याची आम्ही शुटींग करत होतो. यावेळी डेविड संतापले. ते मला ओरडले कारण मी शॉटसाठी तयार होते पंरतु कॉस्ट्युममध्ये काही लावायचं होतं ज्यामुळं लेट होत होतं.

सारा म्हणाली, वरुण व्हॅनमध्ये कॉस्ट्युम संबंधित काही काम करत होता. परंतु शॉट साठी लेट होत होतं म्हणून डेविड नाराज झाले होते. रागावले तर तर वरुण वर होते परंतु सर्व राग त्यांनी माझ्यावर काढला. नंतर सर्वकाही ठिक झाले असंही सारानं सांगितलं.

साराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच ती लव आज कल 2 मध्ये दिसली होती. यानंतर आता ती कुली नंबर वन या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत वरुण धवन प्रमुख भूमिकेत असणार आहे. याशिवाय सारा अतरंगी रे या सिनेमातही काम करत आहे. या सिनमात तिच्यासोबत अक्षय कुमार आणि साऊथ सुपरस्टार धनुष असणार आहेत.

 

You might also like