‘खिलाडी’ अक्षय पुन्हा बनला ‘पॅडमॅन’, भूमी पेडणेकरनंही केलं लोकांना ‘हे’ स्पेशल अपील

पोलीसनामा ऑनलाइन – लॉकडाऊन लागू झाल्यानंतर बॉलिवूड स्टार अक्षय कुमार सतत लोकांची मदत करत आला आहे. पुन्हा एकदा अभिनेता पॅडमॅन म्हणून समोर आला आहे. पीरियड्सच्या काळातील स्वच्छता आणि पॅड्सबद्दल त्यानं लोकांना सोशल मीडियावरून स्पेशल अपील केलं आहे.

अक्षय कुमारनं ट्विट करत म्हटलं आहे की, “एका चांगल्या कामासाठी तुमची मदत हवी आहे. कॉविडमुळं पीरियड्स थांबणार नाहीयेत. मुंबईत वंचित महिलांना सॅनिटरी पॅड देण्यासाठी मदत करा. प्रत्येक डोनेशन महत्त्वाचं आहे.”

समर्पण नावाची एक एनजीओ हे जी एफईसीसी सोबत मिळू काम करत आहे आणि मुंबईत गरजू महिलांसाठी 10000 सॅनिटरी पॅड्स उपलब्ध करत आहे. समर्पणनं ट्विट करत अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर यांना टॅग केलं आहे. याशिवाय भूमीनंही ट्विट करत सांगितलं आहे की, यासंदर्भात तिनंही लोकांना ट्विट करत मदतीचं आवाहन केलं आहे.

अक्षयच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर त्याचा सूर्यवंशी हा आगामी सिनेमा 24 मार्च 2020 रोजी रिलीज होणार होता. परंतु कोरोनामुळं सिनेमाची रिलीज डेट टाळण्यात आली होती. याशिवाय तो आगामी लक्ष्मी बॉम्ब आणि अतरंगी रे या सिनेमातही काम करताना दिसणार आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like