PM इम्रान खानशी घनिष्ठ संबंध असलेल्या ‘या’ PAK अभिनेत्याने स्वतःला सांगितलं ISI एजंट, सर्वत्र खळबळ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानच्या एक प्रसिद्ध अभिनेत्याने ट्विट करत स्वत:ला पाकिस्तानी गुप्तचर संघटनेचा एजेंट असल्याचे सांगितले. याच अभिनेत्या संबंधित एका भारतीय चॅनलने दावा केला होता की तो आयएसआयचा अंडरकवर एजेंट आहे. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणीही नाही तर हमजा अली अब्बासी आहे. हमजाने आता ट्विट करत ही माहिती दिली. आता हमजाच्या या ट्विटवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. आतापर्यंत अनेक मिडिया रिपोर्टने दावा केला ही हमजा हा पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खानचा जवळचा मानला जातो.

फक्त मीच नाही तर हे देखील आयएसआय एजेंट
पाकिस्तानी कलाकार हमजा अली अब्बासीने पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिवसाला ट्विटवर ही प्रतिक्रिया दिली. भारतीय मिडियावर टीका करत त्यांने पोस्ट केले की, एका भारतीय चॅनलने दावा केला की मी आयएआयचा अंडरकवर एजेंट आहे. हे सत्य नाही, मी अंडरकवर नाही तर पूर्णता आयएसआयचा एंजेट आहे. मी हे स्पष्ट करु इच्छितो की फक्त मीच नाही तर पाकिस्तानचे सर्वच २० कोटी लोक आयएसआयचे एजेंट आहे.

या ट्विट आता पाकिस्तानी नागरिकांच्या अनेक प्रतिक्रिया पाहिला मिळत आहे. अनेकांनी त्याला समर्थन दिले आहे तर अनेकांनी त्याला ट्रोल केले आहे.

पंतप्रधान मोदींवर केली होती टीका
अब्बासने आपल्या मिडिया अकाऊंटवरुन पंतप्रधान मोदी आणि काश्मीर मुद्यावर केलेल्या विवादित ट्विटमुळे चर्चेत आला आहे. त्यांने मागील काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी यांना टॅग करत आरएसएस आणि भाजपच्या विचारधारेवर ट्विट केले होते. विशेष म्हणजे पाकिस्तानी मिडियाने एकदाही त्यांच्या या विधानांमुळे त्याच्यावर निर्बंध लादले नाही.

आरोग्यविषयक वृत्त –

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like