‘या’ पाकिस्तानी ॲक्ट्रेसला झाली तीव्र डोकेदुखी, लोकांना विचारला ‘देशी’ उपाय, एकानं म्हटलं- ‘कोरोनाव्हायरस…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार शाहरुख खानसबोत रईस सिनेमात दिसलेली अभिनेत्री माहिरा खान सध्या आजारी आहे. सध्या ती डोकेदुखीनं त्रस्त आहे. तिनं ट्विट करत चाहत्यांना डोकेदुखीवर औषध विचारलं असता अनेकांनी वेगवेगळे उपाय सुचवले आहेत. माहिराचं ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

माहिरा खान आपल्या ट्विटमध्ये म्हणते, “मला दोन दिवसांपासून डोकेदुखी आहे मी 4-6 तासांत औषध घेत आहे. परंतु ही डोकेदुखी जात नाहीये. मला कोणी असा उपाय सांगेल का की, ज्यानं ही डोकेदुखी दूर होईल?” माहिराच्या ट्विटनंतर लगेचच नेटकऱ्यांचे रिप्लाय यायला सुरुवात झाली. अनेकांनी तिला वेगवेगळे उपाय सुचवले आहेत.

एका युजरनं म्हटलं की, सिगारेट पिणं सोडून दे. एकानं तिला सल्ला दिला की, रणवीर सिंगसोबत स्मोक कर.

एकानं सांगितलं की, अंधाऱ्या खोलीत जाऊन झोप. तर काहींनी गंमत करत म्हटलं की, अंधारात झोप नाही येत. काहींनी तिला डोळे चेक करण्यासाठीही सल्ला दिला. एकानं असंही म्हटलं की, हा कोरोना व्हायरसचा हल्ला असू शकतो.