‘या’ पाकिस्तानी अभिनेत्रीला झाला डोकेदुखीचा त्रास, चाहत्यांना विचारत आहे याचा उपाय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानसोबत ‘रईस’ या चित्रपटात दिसणारी पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान आजकाल आजारी आहे. तिला तीव्र डोकेदुखीचा त्रास होत आहे. याबद्दल तिने ट्विट केले असून सध्या ती आपल्या चाहत्यांना उपचारासाठी विचारत आहे. ट्विटवर अनेक चाहत्यांचे कमेंट येत आहेत. चाहते तिला वेगवेगळ्या प्रकारच्या टिप्स सांगत आहेत. त्यांचे ट्विट खूप व्हायरल होत आहे.

पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानने ट्विटरवर लिहिले की, ‘मला दोन दिवस झाले डोकेदुखीचा त्रास आहे. मी दर 4-6 तासांनी औषधे घेत आहे. पण ही डोकेदुखी दूर होत नाही. अशी काही टीप आहे का की हा त्रास दूर होईल ? ‘

या ट्विटला माहिरा खानचे चाहते प्रत्युत्तर देत आहेत. ट्विटरवरच लोक तिला उपचार सांगत आहेत. एका युजरने लिहिले की, ‘तुम्ही सिगारेट ओढणे थांबवा.’ त्याचवेळी एका युजरने तिला सल्ला दिला की, ‘रणबीर सिंगसोबत धूम्रपान कर.’एका युजरने सांगितले की, आपण खूप पाणी प्या.

एका युजरने तिला अंधाराच्या खोलीत झोपायचा सल्ला दिला. त्याचबरोबर म्हणाला की, डोकेदुखी आपल्याला झोपू देत नाही. या व्यतिरिक्त काही लोकांनी माहिरा खानला डोळे तपासण्याचा देखील सल्ला दिला, तर काहींना अशी भीती वाटली की कोरोना व्हायरस होऊ शकतो.

माहिराबद्दल बोलायचे म्हणले तर ‘रईस’ या चित्रपटात माहिरा खान आणि शाहरुख खान नवरा-बायकोच्या भूमिकेत दिसले होते. माहिरा खानने चित्रपटाच्या सीनचे दोन व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यासह तिने लिहिले, ‘माझ्या आवडीचे व्हिडिओ’