कुलभूषण जाधव यांच्यावर ‘टिका’ केल्यामुळे पाकिस्तानी अभिनेत्री वीना मलिक ‘ट्रोल’ !

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – पाकिस्तानी तुरूंगात बंद असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव काही दिवसांपासून चर्चेत आहेत. कुलभूषण जाधववर, भारताने आंतरराष्ट्रीय कोर्टाकडून मोठा विजय मिळवला आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानमध्ये खूप गोंधळ उडाला आहे. नुकताच पाकिस्तानी अभिनेत्री वीना मलिकने या निर्णयावर एक विवादित ट्विट केले आहे. तिने या निर्णयावर नाराजगी व्यक्त करत कुलभूषण जाधव यांच्या विषयी चुकीचे वक्तव्य केले. त्यानंतर वीना मलिकाला तिचे हे ट्विट तेव्हा भारी पडले. जेव्हा काही ट्विटर यूजर्सने तिला जुन्या गोष्टीचीं आठवण देत ट्रोल करण्यास सुरवात केली.

https://twitter.com/iVeenaKhan/status/1151479235837661185

वीना मलिकने ट्विटर अकाउंटवर लिहिले की, ‘आतंकवादी और हत्यारे कुलभूषण जाधव के प्रति कोई नरमी नहीं बरती जानी चाहिए. जो आप बोलते हों, वहीं आप काटते हैं. तो भारत के जासूसों और आतंकवादियों को उदाहरण देने के लिए वाघा बॉर्डर पर कुलभूषण जाधव को फांसी दे देनी चाहिए.’
image.png
आणि तिचे हे ट्विट सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आले आहे. जशी ही पोस्ट समोर आली त्यानंतर लोकांनी विना मलिकला जोरदार ट्रोल करण्यास सुरवात केली. विना मलिकला काहींनी ‘बिग बॉस’ मधील तिचे कॉन्ट्रोवर्शियल दिवस आठवून दिले. तर काहींनी तिला पाकिस्तानची पानोती बोलणे सुरु केले. आणखी काही लोकांनी तिला मूर्ख बोलणे चालू केले. काही यूजर्सने पाकिस्तान मधील स्थितीवर मीम बनवणे चालू केले. या सर्व कमेंट्स बघून असे कळते की, वीना मलिकला हे ट्विट करणे खूप भारी पडले. ट्रोल झाल्यानंतर वीना मलिकची आत्तापर्यंत एकही प्रतिक्रिया आली नाही.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like