DDLJ मधील ‘हा’ आयकॉनिक सीन ‘या’ हॉलिवूडपटातून केलाय Copy ! ‘हा’ आहे पुरावा (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड स्टार शाहरुख खान आणि काजोल यांचा 1995 साली आलेला दुलवाले दुन्हनिया ले जाएंगे हा सनेमा ब्लॉकबस्टर सिनेमा ठरला. आदित्य चोपडांनी या सिनेमातून डायरेक्शनमध्ये डेब्यू केला होता. सिनेमा हॉलमध्ये दीर्घकाळ चाललेला हि सिनेमा आजही चाहते मोठ्या आवडीनं पाहतात. आज सिनेमातील एका सीनबद्दल आपण माहिती घेणार आहोत जी चाहत्यांना नाराज करू शकते.

या सीन आहे की, जेव्हा काजोल ट्रेनकडे जात असते तेव्हा शाहरुख तिच्या वळून बघण्याची वाट बघतो आणि पलट म्हणतो. तो पलट,पलट म्हणत असातना काजोलही पलटून बघते आणि स्माईल करते. हा एक आयकॉनिक सीन आहे जो एका हॉलिवूड सिनेमातून चोरण्यात आला आहे.

असं म्हटलं जात आहे की, हा सीन 1993 साली रिलीज झालेल्या क्लिंट ईस्टवुडचा सिनेमा इन द लाईन ऑफ फायर मधून घेण्यात आला आहे. सध्या या सिनेमातील हा सीन आणि डीडीएलजेमधील तोच सीन सोशलवर व्हायरल होत आहे. दोन्ही सीनमध्ये साम्य दिसत आहे.

वोल्फगँग पीटरसन डायरेक्टेड या हॉलिवूडपटात क्लिंट ईस्टवुडच्या रुपात फ्रँक होरिगन आणि रेनी रूसो लिलीच्या भूमिकेत होती. हा सीन वॉशिंग्टन डीसीच्या लिंकन मेमोरियलजवळील असून दोन्ही स्टार्स तिथे गप्पा मारताना दिसत आहेत.

खास बात अशी आहे की, डायरेक्टर आदित्य चोपडा यांनीही ही बाब कबूल केली होती. ते हॉलिवड सिनेमातील दृश्यांवरून प्रेरीत आहेत. आदित्य चोपडा रिलीव्स या पुस्तकात त्यांनी ही बाब मान्य केली आहे.

त्यांनी सांगितलं आहे की, हा सीन त्यांच्या डोक्यात बसला होता. डीडीएलजे करताना हा सीन मला पुन्हा आठवला आणि मग मी हा सीन वापरला.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like