परिणीति चोप्राच्या बॉयफ्रेंडने दिला ‘धोका’ ; म्हणाली, ‘त्याने माझं मन पुर्णपणे मोडलं’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची प्रसिद्धी अभिनेत्री परिणीति चोप्राचा चित्रपट ‘जबरिया जोड़ी’ च्या प्रदर्शनाची तारीख पुढे गेली आहे. अशामध्ये परिणितीला पुढच्या आठवड्यात चित्रपट प्रमोशनासाठी वेळ द्यावा लागेल. एका मुलाखतीमध्ये तिने आपल्या ब्रेकअपची पुर्ण कथा सांगितली. परिणीतिने सांगितले की, तिच्या ब्रेकअपनंतर ती पुर्ण निराश झाली होती. परिणीतिने आपल्या एक्स बॉयफ्रेंडचे नाव अद्याप सांगितले नाही पण त्याची पुर्ण कथा सांगितली आहे.

    

अनेकदा परिणीतिचे नाव असिस्टंट डायरेक्टर चरित देसाईसोबत जोडले गेले होते, पण कधीच परिणीतिने या व्यक्तीसोबत आपल्या नात्याचा स्विकार केला नाही. तिने अनेकदा हे अफवा असल्याचे सांगितले आहे. परिणीतिने आपल्या पर्सनल लाइफबद्दल सोशल मिडियावर कधीच जाहीर केले नाही. ही पहिलीच वेळ आहे की तिने आपल्या ब्रेकअपबद्दल खुलासा केला आहे.

अभिनेत्री परिणीति चोप्राने मुलाखतीमध्ये सांगितले की, ‘तो माझ्या जीवनातील खूपच वाईट काळ होता. माझे मन पुर्णपणे तुटले होते. मला वाटत होते की, मी एकदम एकटी पडले आहे. असे पहिल्यांदा झाले होते की, कोणीतरी मला नाकारले होते. माझ्या जीवनात पहिले असे कधीच झाले नाही.’

परिणितीने पुढे सांगितले की, परिवाराने तिला त्याकाळीत खूप साथ दिली. तिच्या परिवाराला तिचे दुःख जाणवत होते. तिचे म्हणणे आहे की, ब्रेकअपनंतर ती अजून जास्त मजबूत झाली होती. तिने सांगितले की, ‘मी देवाचे खूप आभार मानते की, मला माझे जीवन पुन्हा आनंदात घालवता आले. मी या ब्रेकअपमधून खूप काही शिकले.’

जेव्हा परिणीतिला त्या मुलाबद्दल विचारले गेले ज्याने तिला नाकारले तेव्हा तिने स्पष्ट नकार दिला. परिणिती म्हणाली की, ‘मी तुमच्या बोलण्याला नकार देत नाही किंवा स्विकारतही नाही कारण मला हे गुपित ठेवायचे आहे. ‘


परिणीतिबद्दल बोलायचे म्हणले तर तिचा आगामी चित्रपट ‘जबरिया जोड़ी’ २ ऑगस्टला प्रदर्शित होणार होता पण याची तारीख पुढे घेऊन ९ ऑगस्टला होणार आहे. परिणीतिने आपल्या पुढच्या चित्रपटाच्या कामाला सुरुवात केली आहे. तिचा आगामी चित्रपट बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल असणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

७ दिवसात आत जाऊ शकते पोट, ‘हे’ ११ उपाय आहेत ‘रामबाण’
आरोग्य समस्यांवर ‘हे’ १० छोटे-छोटे घरगुती उपाय, जाणून घ्या
भारतात HIV पेक्षाही ‘हिपॅटायटीस’ अधिक घातक, पावसाळ्यात विशेष काळजी घ्या
‘सेक्स पॉवर’ कमी झाल्यास बिघडू शकते वैवाहिक जीवन, करा ‘हे’ खास उपाय
अशाप्रकारे परत मिळू शकते त्वचेची चमक, ‘हे’ ४ उपाय आवश्य करा
औषधी न घेता आहाराने लिव्हर ठेवा ठणठणीत, जाणून घ्या ११ उपाय