राजकुमार रावचा फोटो पाहून कमेंट करण्यापासून स्वत:ला थांबवू शकली नाही गर्लफ्रेंड पत्रलेखा ! म्हणाली – ‘उफ्फ…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार राजकुमार राव (Rajkummar Rao) आणि त्याची गर्लफ्रेंड अ‍ॅक्ट्रेस पत्रलेखा (Patralekha) सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतात. दोघं कायमच आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. इतकंच नाही तर दोघं एकमेकांच्या फोटोंवर कमेंटसुद्धा करत असतात. अलीकडेच राजकुमार रावनं एक पोस्ट शेअर केली. हे पाहून पत्रलेखा त्यावर कमेंट करण्यापासून स्वत:ला रोखू शकली नाही.

राजकुमारनं त्याच्या इंस्टावरून एक फोटो शेअर केला. हा एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो होता. यात त्याचे हावभाव पाहून असं वाटत आहे की, तो कशाचा तरी खोलवर विचार करत आहे. कॅप्शनमध्ये राजकुमार म्हणतो, हे कधीही विसरू नका तुम्ही सुरुवात का केली होती.

राजकुमार रावचा हा फोटो सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. यावर चाहत्यांनी कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. परंतु गर्लफ्रेंड पत्रलेखाच्या कमेंटनं मात्र साऱ्यांचं लक्ष वेधलं. कमेंट करताना पत्रलेखा म्हणते, उफ्फ. यावर राजकुमारनंही खास रिप्लाय देत लिहिलं की, उफ्फ-उफ्फ.

राजकुमार राव आणि पत्रलेखा दीर्घकाळापासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघं कायम एकत्र दिसत असतात. 2010 मध्ये लव सेक्स और धोका सिनेमादरम्यान त्यांची भेट झाली होती. एका शॉर्ट फिल्मच्या शूटिंगदरम्यान राजकुमार आणि पत्रलेखा यांच्यातील जवळीकता वाढली. पत्रलेखा आणि राजकुमार यांनी नानू की जानू आणि लव गेम्स अशा काही सिनेमात एकत्र काम केलं आहे. गेल्या 8 वर्षांपासून दोघं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत.

राजकुमारच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर अलीकडेच त्याचा छलांग सिनेमा रिलीज झाला आहे. यात अ‍ॅक्ट्रेस नुसरत भरूचादेखील दिसली होती. हा सिनेमा ओटीटी वर रिलीज झाला आहे. लवकरच तो बधाई दो आणि रुही अफजाना सिनेमात काम करताना दिसणार आहे.

You might also like