‘या’ प्रकरणामुळं अभिनेत्री पायल रोहतगी पोलिसांच्या ताब्यात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बिग बॉस फेम अभिनेत्री पायल रोहतगीला राजस्थान पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पायलच्या टीमनं याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे. पायलनं आपल्या ट्विटरवरून एक वादग्रस्त व्हिडीओ शेअर केला होता. त्यानंतर राजस्थान पोलिसांनी ही कारवाई केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी पायलला अहमदाबादमधून ताब्यात घेतलं आहे. काही दिवसांपूर्वीच युवा काँग्रेस नेता चर्मेश शर्मा यांनी पायल रोहतगी विरोधात तक्रार दाखल करत कारवाई केली होती. या तक्रारीत पायलवर गंभीर आरोप करण्यात आले होते.

https://twitter.com/Payal_Rohatgi/status/1206074851276083200

बुंदीच्या एसपी ममता गुप्ता म्हणाल्या, “पायल रोहतगीला ताब्यात घेण्यात आलं आहे.” पायलनं आपल्या अकटेची माहिती देत असे ट्विट केले होते की, “मला राजस्थान पोलिसांनी मोतीलाल नेहरूंवरील एक व्हिडीओ शेअर केल्याबद्दल ताब्यात अटक केली आहे. हा व्हिडीओ मी गुगलवरून माहिती घेऊन बनवला होता. अभिव्यक्ती स्वातंत्र्य केवळ एक थट्टा आहे.” यामध्ये तिनं राजस्थान पोलीस, पीएमओ आणि होम मिनिस्ट्रीच्या ऑफिशयल ट्विटर अकाऊंटला टॅग केलं होतं.

पायलवर आरोप आहेत की, तिनं स्वातंत्र्य सेनानी पं. मोतीलाल नेहरूंच्या कुटुंबातील महिला आणि माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्यावर अभद्र शब्दात टिप्पणी केली होती. यानंतर पोलिसांनी कारवाई केली होती. पायलविरोधात आयटी ऍक्ट कलम 66 आणि 67 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. असे समजत आहे की, पायलनं हा व्हिडीओ 21 सप्टेंबर रोजी फेसबुकवर अपलोड केला होता.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/