पायल रोहतगीचं Twitter Account अचानक सस्पेंड ! व्हिडीओ शेअर करत म्हणाली… (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस आणि मॉडेल पायल रोहतगी आपल्या वादग्रस्त विधानांमुळं कायमच चर्चेत असते. ट्विटरवर कायमच ती बिंधास्त आपलं मत मांडत असते. पायलचं ट्विटर अकाऊंट आता सस्पेंड करण्यात आलं आहे. पायलचं म्हणणं आहे की, तिचं अकाऊंट सस्पेंड करण्यापूर्वी तिला कोणतीही सूचना देण्यात आलेली नाही. ट्विचरच्या या कारवाईबद्दल तिनं नाराजी व्यक्त केली आहे. सोशलवर एक व्हिडीओ शेअर करत तिनं तिचं अकऊंट पूर्ववत करण्यासाठी हाक दिली आहे.

पायलनं तिच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केलं आहे. यात ती म्हणते की, “अर्ध्या तासापूर्वी मला कळालं की, माझं ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्यात आलं आहे, तेही कोणतंही कारण न सांगता. मला याबद्दल फोन, मेसेज किंवा ईमेल अशा कशाच्याही माध्यमातून सूचना देण्यात आलेली नाही. मी कोणालाच शिवीगाळ करत नाही. कोणासाठी अपशब्द वापरत नाही मग माझ्यासोबत असं का झालं.”

View this post on Instagram

Why my Twitter Account is SUSPENDED ?????

A post shared by Team Payal Rohatgi (@payalrohatgi) on

व्हिडीओत बोलताना पायल पुढे म्हणते, “मी फक्त फॅक्टच्या माध्यमातून माझं म्हणणं मांडत असते. परंतु काही प्रभुत्ववादी लोकांमुळं माझं ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्यात आलं आहे. मी तुम्हाला अपील करते की, माझं ट्विटर अकाऊंट पुन्हा सरू करण्यासाठी तुम्ही आवाज उठवा. नाही तर मला तुमच्यासोबत संपर्क साधता येणार नाही.

पायलनं ट्विटरच्या त्या मेसेजचा स्क्रीशॉटही शेअर केला आहे ज्यात तिचं हँडल सस्पेंड झाल्याचं लिहिलं आहे. पायलचं ट्विटर अकाऊंट याआधीही एकदा जूनमध्ये सस्पेंड झालं होतं.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like