सारा अली खाननं शेअर केले भाऊ इब्राहिमसोबतचे खास फोटो ! दिला ‘हा’ मेसेज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार सारा अली खान (Sara Ali Khan) कायमच आपल्या फोटो आणि व्हिडिओंमुळं सोशल मीडियावर अटेंशन घेताना दिसत असते. पुन्हा एकदा सारा चर्चेत आली आहे. अलीकडेच ती सुशांत सिंह राजपूत केसमधील (Sushant Singh Rajput) ड्रग्ज कनेक्शनमुळं चर्चेत आली होती. गेल्या काही दिवसात तणावाचा सामना करणारी सारा आता यातून काहीशी बाहेर येताना दिसत आहे. सारा आता आपल्या भाऊबीजच्या पोस्टमुळं सोशलवर चर्चेत येताना दिसत आहे.

सारानं तिच्या इंस्टावरून भाऊबीजनिमित्तानं भाऊ इब्राहिम अली खान (Ibrahim Ali Khan) सोबत काही फोटो शेअर करत खास मेसेजही लिहिला आहे. तिनं हे फोटो शेअर करत सर्वांना भाऊबीजच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोत नेहमीप्रमाणे इब्राहिम आणि सारा यांची बाँडिंग दिसत आहे. लुकबद्दल बोलायचं झालं तर दोघंही ट्रॅडिशनल लुकमध्ये दिसत आहे.

फोटो शेअर करताना सारा म्हणते, सर्व भाऊ आणि बहिणींना हॅप्पी भाऊबीज. तुला खूप मिस करत आहे. पुन्हा परेशान करण्यासाठी वाट पाहात आहे.

सारा पुन्हा एकदा सोशलवर सक्रिय झाली आहे. भाऊ इब्राहिम सोबतचे तिचे हे फोटो सध्या सोशलवर तुफान व्हायरल होताना दिसत आहेत.

ड्रग केसमध्ये नाव आल्यानंतर सारा अनेक दिवस सोशल मीडियापासून दूर होती. तिनं कोणतीही पोस्ट शेअर केली नव्हती. आता पुन्हा ती काही पोस्ट शेअर करताना दिसत आहे.

साराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच ती लव आज कल 2 मध्ये दिसली होती. यानंतर आता ती कुली नंबर वन या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत वरुण धवन प्रमुख भूमिकेत असणार आहे. याशिवाय सारा अतरंगी रे या सिनेमातही काम करत आहे. या सिनमात तिच्यासोबत अक्षय कुमार आणि साऊथ सुपरस्टार धनुष असणार आहेत.