डिलीव्हरी बॉयनं ‘या’ अभिनेत्रीचा नबंर अ‍ॅडल्ट ग्रुप्सवर शेअर केला, येऊ लागले ‘कॉल’ आणि ‘मेसेज’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – डायरेक्टर मणिरत्नम यांच्या अंजली सिनेमातून चाई़ल्ड आर्टीस्ट म्हणून काम करत इंडस्ट्रीत एन्ट्री करणाऱ्या अ‍ॅक्ट्रेस गायत्री साईनं बुधवारी तेनमपेट ऑल-महिला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. चेन्नईच्या डोमिनोज पिज्जा आउटलेटच्या एका डिलीव्हरी बॉयनं कथितपणे गायत्रीचा नंबर अ‍ॅडल्ट ग्रुपवर शेअर केला होता.

अ‍ॅक्ट्रेसनं ट्विटरवरून या घटनेची माहिती सांगितली आहे. आपल्या ट्विटमध्ये गायत्री म्हणते, “तेनमपेटमध्ये एका डोमिनोज पिज्जा आउटलेटच्या एका डिलीव्हरी एजंटनं 9 फेब्रुवारी रोजी माझ्या घरी नशेच्या अवस्थेतच पिज्जा दिला होता.” असं ती सांगते.

पुढे आपल्या ट्विटमध्ये गायत्री म्हणते, “याच पिज्जा डिलीव्हरी एजंटनं माझा नंबर अ‍ॅडल्ट ग्रुप्सवर शेअर केला. माझी तक्रार अद्याप प्रलंबित आहे कारण तुमच्या ऑफिसमधून अद्याप माझ्याशी कोणताही संपर्क साधण्यात आलेला नाही. माझ्याकडे अनेक कॉल आणि व्हॉट्सअ‍ॅप मेसेज आहेत. जे त्यानं शेअर केले आहेत. कृपया सगळं सुरक्षित रहावं.” गायत्रीनं आणखी एका व्यक्ती बरोबर झालेल्या तिच्या संभाषणाचा स्क्रीनशॉटही शेअर केला आहे. तिला अनेक लोकांनी कॉल आणि मेसेज केले आहेत.

गायत्रीनं शेअर केलेले हे ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. अनेकांनी गायत्रीच्या या ट्विटवर कमेंट करत आपली प्रितिक्रिया दिली आहे.