कंगना रणौतचं Twitter अकाऊंट सस्पेंड करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल ! अभिनेत्रीनंही दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड अॅक्ट्रेस कंगना रणौत (Kangana Ranaut) हिचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्यासाठी मुंबई हायकोर्टात (HIGH COURT OF BOMBAY) याचिका दाखल करण्यात आली आहे. कंगनाचं व्हेरिफाईड ट्विटर अकाऊंट ब्लॉक करावं. कारण ती तिरस्कार पसरवण्याचं काम करते असं याचिकाकर्त्यानं म्हटलं आहे. बार अँड बेंच (Bar & Bench) नावाच्या व्हेरीफाईड ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती देण्यात आली आहे.
Bar & Bench नं ट्विट करत लिहिलं की, कंगना रणौतचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्यासाठी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेत म्हटलं आहे की, कंगना तिच्या अकाऊंटवरून सतत तिरस्कार पसरवत असते. ट्विटमधून ती देशाचं विभाजन करण्याचं काम करत आहे.
BREAKING: Plea filed against Kangana Ranaut in Bombay HC for getting her twitter account @KanganaTeam suspended for "spreading continuous hatred, disharmony in the country and attempting to divide the country with her extremist tweets."@TwitterIndia @OfficeofUT #BombayHC pic.twitter.com/Z01JTcNtrL
— Bar & Bench (@barandbench) December 3, 2020
कंगनानंही यावर प्रतिक्रिया दिली आहे. हेच ट्विट रिट्विट करत तिनं लिहिलं की,मी कायमच अखंड भारताबद्दल बोलत असते. टुकडे टुकडे गँग सोबत लढाई करत असते. आणि माझ्यावर हा आरोप होत आहे की, मी देशाचं विभाजन करत आहे. वाह क्या बात है. आणि हो ट्विटर हा एकमेव प्लॅटफॉर्म नाही जिथं मी माझं म्हणणं मांडू शकते. एका चुटकीसरशी हजारो कॅमेरे माझं स्टेटमेंट रेकॉर्ड करायला येतील.
Ha ha ha I am continuously taking about Akhand Bharat, inevitably fighting tukde gang everyday and I am accused of dividing the nation 😂
Wah!!! Kya baat hai, anyway twitter is not the only platform for me in one chutki thousands camera will appear for my single statement 🙂 https://t.co/0BgAEd7iKO— Kangana Ranaut (@KanganaTeam) December 3, 2020